Breaking

India – Pakistan : हल्लेखोर दहशतवाद्यांचे प्रत्यार्पण का मागितले नाही ?

Congress spokesperson Atul Londhe questions why extradition of the attackers was not sought : पाकिस्तान आणि काश्मीरचा प्रश्न द्विपक्षीय, तिसऱ्याचा हस्तक्षेप नको

Nagpur : ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानसोबत सलग तीन दिवस संघर्ष झाला. त्यानंतर शस्त्रसंधीची पाकिस्तानची विनंती भारताने मान्य केली. भारताने युद्धबंदीची घोषणा केल्यानंतर सरकारवर टिकेची झोड उठवण्यात आली. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विविध आरोप करण्यात आले. आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

नागपुरात आज (१३ मे) सकाळी पत्रकारांशी बोलताना अतुल लोंढे म्हणाले. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. संपूर्ण देशावरील हे संकट होते. या संकटात पक्ष विपक्ष विसरून सर्व जण एकत्र आलो होतो. पण जर पाकिस्तानने युद्ध थांबवण्याची विनंती केली, तर ज्यांनी भारताच्या संसदेसह इतर ठिकाणी हल्ले केले, अशा लोकांचे प्रत्यार्पण पंतप्रधानांनी का मागितले नाही ?

Mahayuti Government : दीक्षाभूमीवरील विकासकामे का बंद केलीत?

भारतावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आमच्या ताब्यात दिल्याशिवाय आम्ही युद्ध थांबवणार नाही, असं ठामपणे पाकिस्तानला का सांगितलं गेलं नाही? भारताने ही संधी सोडल्याचे स्पष्ट दिसत आहे. तसेही पाकिस्तान आणि काश्मीरचा प्रश्न हा द्विपक्षीय आहे. यामध्ये तिसऱ्याचा हस्तक्षेप आम्ही कधीच मान्य करणार नाही, असा स्पष्ट करार झालेला आहे, असे लोंढे म्हणाले.

Local Body Elections : बसपा म्हणते, ‘हम होंगे कामयाब’!

तुम्ही युद्ध थांबवलं नाही, तर तुमच्यासोबतचे व्यापार बंद करेन, अशी धमकी ट्रम्पने दिली. त्या धमकीसमोर भारताने नमते घेतले. असे न करता ट्रम्पच्या धमकीला पंतप्रधानांनी ठोस उत्तर दिलं असतं तर अधिक चांगलं झालं असतं. आता सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि त्यामध्ये पंतप्रधानांनी उपस्थित रहावे, अशी आमची मागणी आहे. संसदेचं अधिवेशन बोलवावं. अधिवेशनात सैन्याचे अभिनंदन करून या विषयावर चर्चा करावी, अशीही आमची मागणी असल्याचे लोंढे म्हणाले.