Breaking

India – Pakistan War : औरंगजेबाची अक्कल आत्ता आली ठिकाणावर !

India’s harsh decisions, Aurangzeb’s wisdom has now come to the right place : भारताने पहिल्यांदाच स्थगित केला सिंधू जल करार

२२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी जम्मू – काश्मीरमधील पहलगाम येथे हल्ला केला होता. भारत सरकारने यानंतर कठोर निर्णय घेत पाकिस्तानला जेरीस आणले. तीन दिवस झालेल्या संघर्षात भारताने पाकिस्तानचे मोठे नुकसान केले. सर्वात महत्वाचे म्हणजे पहलगाम हल्ल्यानंतर सिंधू जल करार रद्द केला. त्यामुळे पाकिस्तानी सरकार आणि जनताही पोळली जाणार आहे. सध्याच नाही, पण याचे परिणाम हळूहळू त्या देशावर दिसू लागतील.

भारतातील पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करणे, दुतावासातील अधिकारी, कर्मचारी कमी करणे, असे कठोर निर्णय भारत सरकारने पहलगाम हल्ल्यानंतर घेतले. तीन दिवस झालेल्या संघर्षानंतर पाकिस्तानला भारताच्या ताकदीचा अंदाज येऊ लागला. म्हणूनच शस्त्रसंधीची विनंती प्रथम त्यांच्याकडून करण्यात आली. त्यानंतरही या युद्धामुळे पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीवर काही फरक पडणार नाही, असे वक्तव्य पाकिस्तानचे अर्थमंत्री मोहम्मद औरंगजेब यांनी केले.

India – Pakistan War : भारताने पाकिस्तानची चांगलीच जिरवली, आता पुरावे येत आहेत समोर !

सद्यस्थितीत भीषण गरमीचा सामना करावा लागत आहे. अगदी आत्ताच नाही. पण काहीच दिवसांनी पाकिस्तानमध्ये पाण्याची मागणी वाढणार आहे. पाकिस्तानात वाहून जाणारे पाणी रोखल्यामुळे त्याचे दुरगामी परिणाम काय होतील, याचा अंदाज पाकिस्तानी सरकार आणि तेथील जनतेला आला आहे. भारताने स्थगित केलेल्या सिंधू कराराबाबत पुन्हा एकदा विचार करावा, अशी विनंती औरंजेबाने केली आहे. हा करार पूर्ववत होईल, असेही औरेगजेबाने म्हटले आहे. तात्काळ कुठलाही परिणाम नाही. पण भविष्यात होणार आहे, असेही त्याने म्हटले आहे. त्यामुळे आत्ता कुठे औरंगजेबाची अक्कल ठिकाणावर आली आहे.

India – Pakistan War : पाकिस्तानचे लोक भिकमांगे, असदुद्दीन ओवेसींनी काढली पाकची लक्तरं !

भारत – पाक सीमेवर सध्या शांतता आहे. दरम्यान काल (१२ मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही. दहशतवाद आणि व्यापारही एकत्र होऊ शकत नाही. तसेच पाणी आणि रक्तसुद्धा एकत्र वाहणार नाही. पाकिस्तानात दहशतवाद पोसला जातोय आणि हे गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. हाच दहशतवाद एक दिवस पाकिस्तानला संपवून टाकेल, असेही मोदींनी म्हटले आहे.