Taliban will also block Pakistan’s water : कुनार नदीवर बांधणार धरण, अधिकाऱ्यांकडून पाहणी
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जम्मू – काश्मीरमधील पहलगाम येथे हल्ला केल्यानंतर भारताने लगेच सिंधू करार संपुष्टात आणत पाकिस्तानात जाणारे पाणी रोखले. त्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानला धडा शिकवला. आता तालिबानने भारताला साथ देण्याचे ठरवले आहे. भारतानंतर तालिबानही पाकिस्तानची पाणी कोंडी करणार आहे. कुनार नदीवर धरण बांधण्याचा निर्णय तालिबान सरकारने घेतला आहे.
वरिष्ठ तालिबानी अधिकाऱ्यांनी नुकतीच कुनार नदीची पाहणी केली. याच कुनार नदीतून पाकिस्तानात पाणी जाते. ते कसे अडवता येईल, यासाठी तालिबानी प्रशासन कामाला लागले आहे. अफगाणीस्तानातून पाकिस्तानात जाणाऱ्या पाण्याची पाहणी करण्यात आली आहे. कुनारसह काबूल नदीवरही धरण बांधण्यात येणार आहे. या दोन नद्यांवर धरणं बांधल्यानंतर पाकिस्तानला पाणी जाऊ शकणार नाही. त्यामुळे तेथे लवकरच पाण्यासाठी हाहाकार उडणार आहे.
पाणी आमच्यासाठी रक्त आहे आणि आता ते धमण्यांच्या बाहेर वाहू देणार नाही. पाकिस्तानात वाहून जाणारे पाणी लवकरात लवकर अडवा, असे निर्देश तालिबानी सैन्याचे जनरल मुबीन यांनी त्यांच्या प्रशासनाला दिले आहेत. दहशतवादी पाठवून भारतावर हल्ला करताना पाकिस्ताने याचा विचारही केला नसेल. अशी अभूतपूर्व कोंडी त्यांची केली जात आहे.
Pakistani terrorists : आरएसएस मुख्यालयावर हल्ल्याचा कट रचणारा अबू सैफुल्ला ठार !
ऑपरेशन सिंदूरनंतर आधीच पाकिस्तान गुडघ्यांवर आला आहे. पाणीच मिळणार नसेल तर आगामी काळ त्यांच्यासाठी चांगलाच अडचणीचा जाणार आहे. भारतावर हल्ला करण्यापूर्वी पाकिस्तान्यांनी हा विचार करायला पाहिजे होता. आता कुठल्याही परिस्थितीत त्यांच्यावर दया दाखवली जाणार नाही, असा संदेशच भारतासह तालिबानने पाकिस्तानी सरकारला दिला आहे.