Breaking

India – Pakistan War : ये तो ट्रेलर है, पिक्चर बाकी है..!

Yeh to trailer hai, picture abhi baqi hai said BJP Leader Chandrashekhar Bawankule : भारत किती बलशाली आहे आणि काय करू शकतो, हे जगाला दाखवलं

Nagpur : भारत आणि पाकिस्तानच्या युद्धात भारताने पाकिस्तानवर मात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शब्द दिल्याप्रमाणे त्यांच्या घरात घुसून त्यांना मारले. दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासोबतच शंभरावर दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. भारत किती बलशाली आहे आणि काय करु शकतो, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फार कमी कालावधीत जगाला दाखवून दिले, असे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

आज (१३ मे) नागपुरात महसूल मंत्री बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, जम्मू – काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी २८ भारतीयांची धर्म विचारून निर्घृणपणे हत्या केली. या घटनेने देश हादरला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमतीने धडाधड निर्णय घेऊन सैन्याला पूर्ण मोकळीक दिली. पाकिस्तानात दडून बसलेल्या नक्षलवाद्यांना त्यांच्याच घरात घुसून मारले आणि पहलगाम हल्ल्याचा बदला १५ दिवसांतच घेतला.

India – Pakistan : हल्लेखोर दहशतवाद्यांचे प्रत्यार्पण का मागितले नाही ?

भारताने पाकिस्तानवर कडक निर्बंध घातले आहेत. त्यांचा ‘दाना – पानी’ बंद केला आहे. यापुढे एक जरी नक्षली कारवाई झाली, तर त्याला युद्ध समजण्यात येईल, असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे. कुठल्याही परिस्थितीत आता दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही. पाकिस्तानने यापुढे अशी हिंमत करूच नये. नाहीतर त्यांची अवस्था आज आहे, त्यापेक्षाही वाईट होईल. तीन दिवसांत भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि त्यांच्या दहशतवाद्यांची ही हालत केली, ‘ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…’, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Mahayuti Government : दीक्षाभूमीवरील विकासकामे का बंद केलीत?

भारत देशासोबत कुणीही बदमाशी करून छेडछाड करण्याचा प्रयत्न करेल, तर देश बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला वाचवण्यासाठी जी भूमिका घेतली, ती अतिशय महत्वाची ठरली. काल रात्री (१२ मे) मोदींनी देशाला संबोधित केले. १४० कोटी भारतीयांचे पाठबळ त्यांच्यासोबत आहे, असे महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले.