Breaking

Indian Armi : ..आता जे.पी. नड्डांनीच माफी मागितली पाहिजे !

Now J.P. Nadda should apologize said Congress president Harshawardhan Sapkal : भाजप नेत्यांकडून सैन्याचा अपमान करण्याचा सपाटा

Mumbai : भारतीय जनता पक्षाचे वाचाळवीर जाणीवपूर्वक भारतीय सैन्यदलाचा अपमान करत आहेत. मध्य प्रदेशच्या विजय शाह नामक मंत्र्याच्या वक्तव्यानंतर मध्य प्रदेशचेच उपमुख्यमंत्री जगदीश देवरा यांनी भारतीय सैन्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केले आहे. भाजपने भारतीय सैन्याचा अपमान करण्याचा सपाटाच सुरू केला असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

मुंबईतील टिळक भवन येथे माध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले, ऑपरेशन सिंदूरचे देदिप्यमान यश हे भारतीय सैन्य दलाचे आहे. संपूर्ण देशाला या पराक्रमाचा अभिमान आहे. परंतु भाजपचे काही नेते वारंवार सैन्याचा अपमान करत आहे. विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल केलेले विधान चीड आणणारे होते. देशभरातून यावर संताप व्यक्त केला जात आहे, अशात भाजपच्या दुसऱ्या नेत्याने पुन्हा घाण ओकली आहे.

Chandrashekhar Bawankule : पुस्तकाचं नाव चुकलं, ‘नरकातला राऊत’, असं पाहिजे होतं !

‘संपूर्ण देश, देशाचे सैन्य आणि सैनिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चरणी नतमस्तक आहेत’, असे निर्लज्जपणाचे विधान जगदीश देवरा यांनी केले आहे. हे वक्तव्य भारतीय सैन्य दलाचे शौर्य, संस्कृती आणि परंपरेचा घोर अपमान करणारे आहे. विजय शाह यांच्यावर भाजपने अद्याप कारवाई केली नाही. त्यातच दुसऱ्या नेत्यांने तशीच मस्ती दाखवली आहे. भाजप नेते सातत्याने बेताल विधाने करत असताना मोदी, शाह, जे.पी. नड्डा गप्प का बसून आहेत, असा सवाल सपकाळ यांनी केला. आता तर जे.पी. नड्डा यांनीच देशाची माफी मागितली पाहिजे.

Marathwada : दादा का वादा; दीड महिन्यात दिले दोन ‘सीट्रीपलआयटी’

भाजप हा निर्ढावलेला व मस्तीखोर पक्ष आहे. जनता हा अपमान सहन करणार नाही. भाजपचे मंत्री विजय शाह व जगदीश देवरा या दोघांवरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. या विकृत नेत्यांना वेड्यांच्या इस्पितळात भरती केले पाहिजे, असेही ते म्हणाले.