Breaking

Operation Sindoor : सामान्यांना इजा न होऊ देता मोडले दहशतवादाचे कंबरडे !

 

Indian Army attacks terrorist camps in Pakistan under Operation Sindoor: विश्वसनीय गुप्त सुचनांच्या आधारे दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले

New Delhi : भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला केला. यामध्ये त्यांचे ९ अड्डे उद्ध्वस्त करून जवळपास १०० दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या संपूर्ण ऑपरेशनदरम्यान दहशतवादाचे कंबरडे मोडण्याचे काम झाले. पण एकाही सामान्य निष्पाप नारिकाला इजा झालेली नाही, अशी माहिती सैन्याच्या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली.

विंग कमांडर व्योमिका सिंह आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी पत्रकारांना सांगितले की, विश्वसनीय गुप्त सुचनांच्या आधारे पाकिस्तान आणि जम्मू – काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ लक्ष्य करण्यात आले. नियोजन करतानाच सामान्य नागरिकांची काळजी घेतली गेली. पाकिस्तान आणि जम्मू – काश्मीरमधील एलओसीपासून ३० किलोमीटर अंतरावरील मुजफ्फराबाद येथे लष्कर – ए – तैयबाचे प्रशिक्षण केंद्र होते, ते उद्धवस्त करण्यात आले.

Operation Sindoor : थरार अनुभवणारे पर्यटक म्हणाले, ‘जय हिंद की सेना’!

 

गुलमर्ग आणि २२ एप्रिलला पहलगाम येथे हल्ला केलेल्या दहशतवाद्यांना येथेच प्रशिक्षण देण्यात आले होते. सईदना बिलाल कॅम्प मुजफ्फराबाद जैश – ए – मोहम्मद चे प्रशिक्षण केंद्र, घुलपूर कॅम्प कोटली हे एओसीपासून ३० किमी दूर होते. हा त्यांचा बेस होता. येथून राजोरीमध्ये दहशत पसरवण्याचे काम होत होते. २० एप्रिलला पुंछ येथे तिर्थयात्रेच्या बस हमल्यासाठी आतंकवाद्यांना येथेच प्रशिक्षीत करण्यात आले होते. बर्नाला बिंबर हे एलओसीपासून ९ किमी होते. शस्त्रात्रांचे प्रशिक्षण आणि जंगलात राहूल हल्ले करण्याचे प्रशिक्षण येथे दिले जात होते. अब्बास कॅम्प कोटली. एलओसीपासू १३ किलोमीटर दूर होते. येथे १५ दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याचे क्षमता होती. हे सर्व तळ नेस्तनाबूत करण्यात आले आहेत.

Operation Sindoor : आता दहशत पाकिस्तानात; शाळा बंद, विमानतळांवर हाय अलर्ट !

सर्जल कॅम्प सियालकोट हे आंतरराष्ट्रीय सीमेपासून ६ किमी दूर आहे. मार्च २०२५ मध्ये जम्मू पोलिसांच्या ४ जवानांची हत्या येथेच प्रशिक्षण घेतलेल्या दहशतवाद्यांनी केली होती. मेहमुना जाया सियालकोट हे आंतरराष्ट्रीय सीमेपासून १२ ते १८ किलोमीटर दूर होते. हिजबूल मुजाहिदीनचा हा मोठा कॅम्प होता. जम्मूत आतंक पसरवणे आणि पठाणकोटवरील हल्ल्याचे नियोजन येथूनच करण्यात आले होते. मर्कस तायबा हे आंतराष्ट्रीय सीमेपासून १८ ते २५ किमी अंतरावर होते. २००८ मध्ये मुंबईवर ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, ते अजमल कसाब. डेव्हीड हेडली येथूनच प्रशिक्षीत झाले होते. मर्कस सुभानअल्ला भवलपूर आंतरराष्ट्रीय सीमेपासून १०० किमी दूर आहे. हे जैशचे मुख्यालय होते. हे सर्व अड्डे उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती विंग कमांडर व्योमिका सिंह आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली.