Indian citizenship to Bangladeshi-Rohingyas by giving birth certificate : ४८४९ अर्जांपैकी शेकडो अर्ज संशयास्पद; भाजप नेते किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप
Akola अकोल्यात जन्म प्रमाणपत्रांसाठी मोठ्या प्रमाणावर फसवेगिरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तहसीलदार कार्यालयाने २०२४ मध्ये ३९५३ अर्जदारांना जन्म प्रमाणपत्रे दिली. मात्र, या अर्जांपैकी शेकडो अर्ज संशयास्पद असून, घुसखोर बांग्लादेशी व रोहिंग्यांना भारतीय नागरिकत्व देण्याचा हा मोठा कट असल्याचा आरोप भाजप नेते डॉ. किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
नोव्हेंबर २०२३ मध्ये तहसीलदारांना ‘उशिरा’ जन्म प्रमाणपत्र देण्याचे अधिकार देण्यात आले. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाले. मात्र, अनेक अर्जांमध्ये फसवे पुरावे जोडले गेले आहेत. केवळ आधारकार्ड, रेशनकार्ड आणि प्रतिज्ञापत्रांच्या आधारे अर्ज मंजूर करण्यात आले.
Union Budget : अर्थसंकल्पाच्या प्रती जाळून किसान सभेचा निषेध !
डॉ. किरीट सोमय्या म्हणाले, ‘अकोला तहसील कार्यालयाने हजारो संशयास्पद अर्ज मंजूर करून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला आहे. हे अर्जदार भारतीय नागरिक आहेत की बांग्लादेशी-रोहिंग्या घुसखोर, याची कसून चौकशी झाली पाहिजे. प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि संगनमताने हा मोठा घोटाळा झाला आहे. यामध्ये दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे.’
अर्जदारांकडून केवळ आधारकार्ड, रेशनकार्ड, प्रतिज्ञापत्रांच्या आधारे अर्ज मंजूर करणे गंभीर आहे. तहसीलदार कार्यालयाने हे पुरावे कसलीही शहानिशा न करता मंजूर केले. त्यामुळे तहसीलदार व कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण गृहमंत्रालय व केंद्रीय यंत्रणांकडे नेण्याचा इशारा दिला आहे. ते म्हणाले, “भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी बांग्लादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांनी मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली आहे. यात तहसीलदार व प्रशासनाची भूमिका संशयास्पद असून, संपूर्ण चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई झाली पाहिजे. अन्यथा, हे प्रकरण आम्ही थेट केंद्रीय तपास यंत्रणांकडे नेऊ.”
FDA’s authority removed : FDA चे अधिकार काढले; शहराचे आरोग्य धोक्यात!
या गैरप्रकारामुळे अकोला आणि आसपासच्या भागात मोठ्या संख्येने घुसखोर बसवले जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. हा प्रकार जर वेळीच थांबवला नाही, तर भविष्यात देशाच्या सुरक्षेसाठी मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
फसवेगिरीचे ठळक प्रकार
अर्जदार शेख नदीम शेख महेबूब – कोणताही पुरावा नसतानाही अर्ज दाखल.
अफसाना बी इब्राहीम खान – २०२२ मध्ये घेतलेले रेशनकार्ड आणि आधारकार्ड पुरावा म्हणून दाखल.
मोहम्मद फारुक खटीक – अर्जातील जन्मतारीख व आधारकार्डातील जन्मतारीख वेगवेगळी.
अलमास परवीन सुफी – वोटिंग कार्ड व आधारकार्डमध्ये जन्मतारीख विसंगत.
जुबेर खान यांनी मुलासाठी अर्ज केला पण कोणताही पुरावा नाही.
साबीर खान – २०२० मध्ये काढलेले रेशनकार्ड व आधारकार्ड पुरावा म्हणून दाखल.
१०० पैकी ९० अर्ज फक्त आधारकार्डवर, तर अनेक अर्जांमध्ये मोठ्या विसंगती.