Breaking

Indian Constitutation : संविधान सभेतील चर्चेचे ७५ तास वाचन!

75 hours of reading of the 75 articles of the Constituent Assembly : अमृत महोत्सवानिमित्त आयोजन; ७५ कलमांचेही होणार सलग वाचन

Nagpur संविधान निर्मितीचा इतिहास लाेकांसमाेर यावा, म्हणून भारतीय संविधानाच्या अमृतमहाेत्सवानिमित्त संविधान सभेतील चर्चेचे व ७५ कलमांच्या निर्मितीचे सलग ७५ तास वाचन करण्याचा अनाेखा उपक्रम नागपुरात हाेत आहे. महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय विभाग, बार्टी आणि दिशा ह्यूमन वेल्फेअर साेसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवार, दि. २३ मे राेजी सकाळी ९ वाजता कामठी राेड, इंदाेरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटरच्या नागार्जुन सभागृहात या उपक्रमाला सुरुवात हाेणार आहे. उपक्रमाच्या अध्यक्षस्थानी डाॅ. देवीदास घाेडेस्वार, ई. झेड. खाेब्रागडे, सामाजिक न्याय विभागाचे विभागीय आयुक्त सिद्धार्थ गायकवाड हे उपस्थित असतील.

Nagpur Municipal Corporation : अडिच कोटींचा महसूल फक्त नोंदणीतून!

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान तयार केल्यानंतर १९४९ साली ते अंगीकृत करण्यात आले. हे संविधान लागू हाेण्यापूर्वी त्यावर वर्षभर संविधान सभेत माेठी चर्चा झाली व त्यानंतरच २६ जानेवारी १९५० साली ते लागू करण्यात आले. यंदा संविधान लागू हाेण्यास ७५ वर्षे पूर्ण हाेत आहेत.

यानिमित्त हा इतिहास लाेकांना समजावा म्हणून संविधान सभेची चर्चा व ७५ कलमांचे सलग ७५ तास वाचन करण्याचा विश्वविक्रम स्थापित करणार आहे. २६ मे राेजी सायंकाळी ५ वाजता या वाचनाचा समाराेप हाेणार आहे. ७५ तास म्हणजे ४ दिवस व ३ रात्र सलग हे वाचन चालणार आहे. ७५ किंवा त्यापेक्षा अधिक इच्छुक नागरिक वाचनासाठी सहभागी हाेतील.

Maharashtra navnirman Sena : शेतकरी कर्जासाठी थांबले आहेत, सरकार झोपले का?” –

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकारीही उपस्थित राहतील. समाराेप समारंभात राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाट व त्यांची मुलगी हर्षदा सिरसाट हेसुद्धा २६ मे राेजी उपस्थित राहणार आहेत.