Breaking

Indian Railway Ministry : जनतेनेच घेतला फॉलो-अप; रेल्वेची ऐतिहासिक कामगिरी !

 

The public took the follow-up; Historic performance of railways : एकाच दिवशी ६ आरएच गर्डर्स टाकण्याचा विक्रम

Bhusaval अकोला बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यातील मतदारांनी रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला. या भागातील विकासकामांसाठी लोकप्रतिनिधी आणि मंत्रालयांकडे तगादा लावला. त्यानंतर प्रशासनाकडून भुसावळ ते बडनेरा या खंडामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे हाती घेतली आहेत.

भुसावळ रेल्वे विभागाने १४ जानेवारी २०२५ रोजी आपल्या इतिहासात एक अभूतपूर्व कामगिरी पार पाडली आहे. भुसावळ-अकोला खंडातील लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक 10A, पूल क्रमांक 514/1, आणि पूल क्रमांक 561/3 (डाऊन आणि अप मार्ग) येथे एकाच दिवसात ६ आरएच गर्डर्स टाकून नवा विक्रम प्रस्थापित करण्यात आला. यापूर्वी, २ जानेवारी २०२५ रोजी भुसावळ-खंडवा भागात एका दिवसात ४ आरएच गर्डर्स टाकण्याचा विक्रम नोंदवला गेला होता. आता या नव्या कामगिरीने तो मोडून काढला आहे.

Ladaki Bahin Yojana : लाडक्या बहिणीचं ओझं नाही!

यंत्रसामग्री आणि कौशल्याचा उपयोग
या ऐतिहासिक कामगिरीसाठी मोठ्या प्रमाणावर यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला. १० पोकलॅन, ११ फरहाना, ८ डंपर या आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला. कठीण व महत्त्वपूर्ण काम अत्यंत कौशल्याने पूर्ण करण्यात आले. या आरएच गर्डर ब्लॉकच्या सावलीत विविध पूरक कामेही यशस्वीरित्या पूर्ण झाली. त्यामुळे रेल्वे नेटवर्क अधिक सक्षम आणि सुरक्षित होणार आहे.

CM Devendra Fadnavis : ‘उडता नागपूर’च्या दिशेने उपराजधानीची वाटचाल!

टीमवर्क आणि अचूक नियोजनाचे यशस्वी उदाहरण
या कामगिरीसाठी रेल्वे कर्मचाऱ्यांचे प्रचंड कौशल्य, अचूक नियोजन, आणि संघभावना कारणीभूत ठरली. भुसावळ विभागाने केलेली ही कामगिरी भविष्यातील आव्हानात्मक प्रकल्पांसाठी प्रेरणादायी ठरेल. भुसावळ विभागातील या अभूतपूर्व कामगिरीमुळे विभागातील रेल्वे नेटवर्क अधिक सुरक्षित, मजबूत, आणि वेगवान होण्यास मदत होणार आहे, असा विश्वास व्यक्त होत आहे.