Big update regarding waiting list for reserved railway tickets : आरक्षित रेल्वे तिकिटाच्या प्रतिक्षा यादी बाबत मोठी अपडेट
New Delhi : आरक्षित रेल्वे तिकिटाच्या प्रतिक्षा यादी बाबत मोठी अपडेट समोर आली आहे. वेटिंग लिस्टचा चार्ट प्रवाशांना 4 तास नाही तर 24 तास अगोदर मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन अगोदरच करता येणार असून मोठी सुविधा मिळणार आहे शिवाय ऐनवेळी होणारी धावपळ थांबणार आहे.
प्रवाशांच्या सुविधेसाठी भारतीय रेल्वेने मोठे पाऊल उचलले आहे. आता आरक्षित तिकिटाची प्रतिक्षा यादी सामान्य भाषेत चार्ट म्हणून प्रसिद्ध आहे ती यादी लवकर समोर येणार आहे. वेटिंग लिस्ट चार्ट प्रवाशांना 4 तास नाही तर आता 24 तासांपूर्वीच ही यादी मिळेल. त्यामुळे त्यांना प्रवासाचे नियोजन अगोदरच करता येईल. रेल्वे प्रवासाचा कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांना नाहक त्रास होणार नाही. तर त्यांना आता 24 तास अगोदरच त्यांच्या प्रवासाचे नियोजन करता येणार आहे.
Akola police : प्रहार, किसान ब्रिगेडचे कार्यकर्ते स्थानबद्ध, पोलिस action mode वर
कन्फर्म तिकीट यादी आणि त्याविषयीचा तक्ता अगोदरच जाहीर करण्या विषयीचे पाऊल 6 जून रोजी उचलण्यात आले आहे. बिकानेर भागातील ट्रेन प्रवासासाठी हा प्रयोग राबवण्यात आला. रेल्वेच्या सूत्रांनुसार सुरुवातीच्या चार दिवसांत या प्रयोगाचे सकारात्मक परिणाम दिसून आले. प्रवाशांना पूर्वीच माहिती मिळते की त्यांचे तिकिट कन्फर्म आहे की नाही. त्यामुळे जर तिकीट कन्फर्म नसेल तर ते दुसर्या साधनांचा वापर करण्यास मोकळे होतात. ते त्यांच्या प्रवासाचे नियोजन करू शकतात. या प्रयोगामुळे त्यांची वेळेवर होणारी फजिती टळणार आहे
Donald Trump vs elon Musk : मस्क यांनी व्यक्त केली खंत; पोस्ट करत सांगितले वाद खुपचं लांबला
बिकानेरमध्ये हा प्रयोग यशस्वी झाल्याने देशातील इतर गर्दीच्या मार्गिकेवर हा प्रयोग लागू करण्यात येणार आहे. रेल्वे वाहतुकीचे जे मार्ग अधिक गर्दीचे आहे. तिथे हा प्रयोग राबण्यात येईल. यामध्ये दिल्ली ते उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि गुजरात सारख्या अनेक राज्यांतील रेल्वे मार्गांचा समावेश आहे. या राज्यातील अनेक मार्गांवर रेल्वे प्रवाशांना प्रतिक्षा यादीची समस्या, अडचण नेहमी भेडसावते. त्यांचे तिकीट वेळेवर कन्फर्म होत नाही. त्यामुळे त्यांना प्रवासात अनंत अडचणींचा सामना करावा लागतो.
Narayan Rane : मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो, राणेंनीच टोचले मुलाचे कान, मुख्यमंत्र्यांनीही खडसावले!
कन्फर्म तिकिटाची यादी तयार करण्यासोबतच अजून एक प्रयोग करण्याचा रेल्वे विभागाचा मानस आहे. त्यानुसार, जर 24 तासांपूर्वी प्रतिक्षा यादी तयार होत असेल आणि प्रवाशांचा आकडा अधिक असेल तर स्थानिक प्रशासन त्या रेल्वेला अतिरिक्त डब्बा जोडू शकतात. याविषयीचा प्रस्ताव रेल्वे मंत्र्यांसमोर अधिकाऱ्यांनी सादर केला होता. त्याला त्यांनी तात्काळ मंजूरी दिली. त्यामुळे प्रवाशांना जागा उपलब्ध होण्याचा मार्ग पण मोकळा होणार आहे