Breaking

Infant death case : बाळंतीण मृत्यू प्रकरणाने खळबळ!

The three-member inquiry committee will submit its report by April 21 : तीन सदस्यीय चौकशी समिती; २१ एप्रिलपर्यंत अहवाल येणार

Gondia शहरातील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात एका बाळंतीणीच्या मृत्यूमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. योग्य वेळी उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी वैद्यकीय प्रशासनाने तातडीने दखल घेतली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांच्या आदेशाने तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.

या समितीत डॉ. अपूर्वा पावडे, डॉ. प्रसाद उपग्नलावर आणि डॉ. सुरेश सुंगध यांचा समावेश आहे. समिती २१ एप्रिलपर्यंत आपला तपशीलवार अहवाल सादर करणार असून, त्यानंतर आवश्यक ती कारवाई केली जाणार आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. नागरिकांत तीव्र संतापाचे वातावरण आहे.

Health minister of Maharashtra : आरोग्य यंत्रणेचा बट्ट्याबोळ; २५ गावांमध्ये रुग्णांचे हाल!

अशी आहे घटना

आंबेडकर वॉर्ड सिंगलटोली येथील प्रतिभा मुकेश उके (वय ३०) हिला ११ एप्रिल रोजी दुपारी ४:३० वाजता बाई गंगाबाई महिला रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. १२ एप्रिलच्या पहाटे २:०७ वाजता तिने सामान्य प्रसूतीतून बाळाला जन्म दिला. मात्र, त्यानंतर तिच्या शरीरात तीव्र रक्तस्राव सुरू झाला. डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया केली, पण तिची प्रकृती आणखी गंभीर झाली.

१२ एप्रिल सकाळी १० वाजता तिला केटीएस जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. दोन दिवस उपचार सुरू असतानाही तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि १५ एप्रिल रोजी सकाळी ११:३२ वाजता तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मृत महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील डॉक्टरांवर गंभीर आरोप करत सांगितले की, सामान्य प्रसूतीसाठी वेळ काढली गेली, सिझेरियन शस्त्रक्रियेचा निर्णय उशिरा घेतला गेला. त्यामुळे पोटावर ताण येऊन गर्भाशय फाटले आणि तीव्र रक्तस्राव झाला. वेळेवर योग्य उपचार झाले असते, तर मृत्यू टळू शकला असता, असा त्यांचा दावा आहे.

Vanchit bahujan aaghadi : आंबेडकर म्हणाले, एकत्र लढलो तरच फायदा

या गंभीर प्रकरणाची दखल घेत अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांनी तातडीने चौकशी समिती नेमली आहे. सध्या मृत महिलेच्या कुटुंबीयांकडून रुग्णालयाकडे लेखी तक्रार सादर करण्यात आलेली नाही, मात्र चौकशीच्या आधारावर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.