Instagram Love story : अडिच वर्षांपूर्वी घर सोडून गेली, बाळासोबत परतली!

A young woman who ran away returned home with a baby : इन्स्टाग्रामवर तरुणाशी झाली होती ओळख; पळून लग्न केले

Nagpur अडिच वर्षांपूर्वी एक अल्पवयीन मुलगी नागपुरातून घर सोडून जाते. इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या एका तरुणासोबत पुण्यात जाऊन राहते. १८ वर्षांची झाल्यानंतर तिने त्या तरुणासोबत लग्न केलं. मुलीच्या घरचे तिच्या शोधात होते. आता ती अडिच वर्षांनी ती घरी परतली, पण तिच्या हाती पाच महिन्यांचं बाळ होतं. त्यामुळे घरच्यांनाही कसे स्वागत करावे, हा प्रश्न पडला.

इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर अल्पवयीन मुलगी आणि युवक लवकरच एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. मुलीच्या घरच्यांना याची चुणूक लागली अन् दोघांनी पळ काढला प्रेमविवाह केला. अडीच वर्षांनी त्यांचा सुगावा लागला आणि पोलिसांनी शहरात आणले. यावेळी मात्र, पळून गेलेल्या त्या अल्पवयीन मुलीसोबत तिचे ५ महिन्यांचे बाळ देखील सोबत होते.

Food & Drugs Department : उपवास करताय? भगरीमध्ये असू शकते बुरशी!

एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १६ वर्षीय तरुणीची ही कहाणी आहे. इन्स्टाग्रामवर चंद्रपूर येथील एका २२ वर्षीय युवकाशी तिची ओळख झाली होती. एकमेकांशी बोलताना ते अधिक जवळ आले. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. त्यांना लग्न करायचं होतं. पण तिचं वय नव्हतं. मुलीच्या कुटुंबियांना प्रकरण कळले. त्यामुळे त्यांनी समजूत काढली. पण तरुणीने चंद्रपूर गाठले आणि मुलासोबत पुण्याला निघून गेली. १८ वर्षांची होईपर्यंत वाट बघितली.

पुण्यात प्रियकराने काम शोधले आणि दोघेही भाड्याने राहू लागले. अल्पवयीन असताना लग्न केल्याचे कायदेशीर परिणाम त्यांना कदाचित माहिती असावे म्हणून १८ वर्षांची झाल्यानंतरच त्यांनी लग्न केले. प्रियकराच्या कुटुंबीयांनी त्यांचे लग्न मान्य केल्यानंतर ते चंद्रपूरला सोबत राहू लागले. तर तिचा पती हा कामानिमित्ताने पुण्यात ये-जा करायचा. इकडे मुलगी सापडत नसल्याने सोनालीच्या घरचे पोलिसांकडे सतत विचारपूस करत होते.

दरम्यान, गुन्हे शाखेला सोनालीचे लोकेशन सापडले. त्यांनी चंद्रपूर गाठले. यावेळी तिचा पती पुण्याला होता. पोलिसांनी सोनाली आणि तिच्या ५ महिन्यांच्या बाळाला नागपूरला आणले. घरच्यांची भेट घडवून आणली.

Koteshwar Wardha : हेमाडपंथी कोटेश्वर मंदिर आकर्षणाचे केंद्र!

सोनाली आणि आताचा पती यांची इन्स्टाग्रामवर २०२१ मध्येच ओळख झाली होती. घरच्यांच्या विरोधामुळे दोघांनीही घर सोडत उत्तरप्रदेश गाठले. पोलिसांना तक्रार मिळाल्या त्यांनी दोघांचे लोकेशन शोधून काढत उत्तरप्रदेशातून दोघांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर ६ आॅगस्ट २०२२ मध्ये पुन्हा ते दोघे पळून गेले होते.