Breaking

Insult of Chief Justice : सरन्यायाधीश आंबेडकरी विचारांचे आहेत म्हणून का..?

Congress leader Nana Patole writes letter to President, take action against officials who do not follow protocol : काँग्रेस नेते नाना पटोले यांनी लिहीले राष्ट्रपतींना पत्र

Nagpur : भारताचे सरन्यायाधीश भूषण आर. गवई हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. त्यावेळी महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या दौऱ्याचा शिष्टाचार पाळला नाही. परिणामी सरन्यायाधीशांचा घोर अपमान झाला. यासंदर्भात भूषण गवई यांनी स्वतः जाहीरपणे तीव्र शब्दांत नाराची व्यक्त केली आहे. तर विरोधी पक्षांतील नेत्यांनीही सत्ताधाऱ्यांवर आसूड ओढले. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनीही राज्य सरकारवर कडवी टीका केली आहे.

नाना पटोले यांनी X वर प्रतिक्रिया देत सरकारच्या इभ्रतीचे वाभाडे काढले आहेत. ते म्हणतात ‘भारताचे नवनियुक्त सरन्यायाधीश भूषण गवई महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असताना राज्य सरकार व प्रशासकीय यंत्रणेकडून त्यांच्या स्वागतात आणि सुरक्षेत आवश्यक असलेला प्रोटोकॉल पाळण्यात आला नाही. केवळ त्यांच्या व्यक्तिगतरित्या झालेल्या दुर्लक्षापुरतेच हे प्रकरण मर्यादित नाही, तर हा प्रकार थेट भारतीय संविधानाच्या प्रतिष्ठेवर आघात करणारा ठरतो.

Kerala Lottery : गोव्याच्या सुपुत्राचे महाराष्ट्राशी असलेले भावनिक नाते उल्लेखनीय !

सरन्यायाधीष गवई हे आंबेडकरी विचारांचे आहेत म्हणून महाराष्ट्रात त्यांचा अपमान केला आहे का, हादेखील प्रश्न उपस्थित होतो. सरन्यायाधीशांनी स्वतः आपल्या भाषणातून राज्य सरकारच्या आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या या विधानामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या प्रकरणाकडे वळले आहे. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर आज (२० मे) राष्ट्रपतींना पत्र लिहून प्रोटोकॉल न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.’