Breaking

Panchayat Samiti Election : अर्जुनी मोरगावमध्ये भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर !

Internal Politics in the BJP is at the fore : पक्षाचा व्हीप झुगारून बंडखोरी, काँग्रेसने संधी साधली

Arjuni Morgaon लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात अपयश आले. पण विधानसभा निवडणुकीत महायुतीने दमदार कमबॅक केले. स्पष्ट बहुमत मिळाले. भाजपने तर अभूतपूर्व कामगिरी केली. त्यामुळे आता राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचेच सरकार येईल, असा दुर्दम्य आत्मविश्वास बाळगला जात आहे. पण स्थानिक राजकारणाचा महायुतीला फटका बसणार याचा अंदाज होता. त्याचा पहिला धक्का भाजपला बसला आहे. अर्जुनी मोरगाव येथील भाजपचे अंतर्गत राजकारण Politics चव्हाट्यावर आलं आहे.

एकूण १४ सदस्यीय पंचायत समितीत सहा भाजपाचे, चार काँग्रेसचे, दोन राष्ट्रवादीचे बलाबल आहे. यासोबत एक पूर्वाश्रमीचे भाजप व अपक्ष म्हणून निवडून आलेले आणि एक वंचित आघाडीचे असे समीकरण आहे. उपसभापतिपदासाठी भाजपाचे अनेक सदस्य आग्रही होते. सुरुवातीला संदीप कापगते, नूतन सोनवणे, डॉ. नाजूक कुंभरे बाशिंग बांधून होते. नंतर कापगते व सोनवाने या दोघांनी आपली दावेदारी लावून धरली. शेवटपर्यंत ते दोघेही उपसभापतिपदाच्या शर्यतीत राहिले. पक्षाच्या आदेशाला न जुमानता संदीप कापगते यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने भाजपमधील गटबाजी उघडकीस आली.

Panchayat Samiti Election : भाजपच्या बंडखोराने घेतली काँग्रेसची मदत

पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे चार सदस्य आहेत. या निवडणुकीत काँग्रेसने भाजपच्या हालचालीवर लक्ष केंद्रित केले होते. काँग्रेसने सावध पवित्रा घेत भाजपाच्या गटबाजीला नाट्यमयरीत्या पाठिंबा दिला. ऐनवेळी भाजपचे बंडखोर उमेदवार संदीप कापगते यांना मतदान केल्याने कापगते यांची उपसभापतिपदी निवड झाली.

Love story of teenager : ‘पटना से आयी नागपूर.. फिर भी ना मिला सजना !’

पंचायत समितीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर सभापती राष्ट्रवादी काँग्रेसचा व उपसभापती भाजपाचा होणार हे निश्चित होते. वरिष्ठांचा आदेश जो येईल त्याची अंमलबजावणी केली जाईल असे सांगितले जात होते. भाजप जिल्हाध्यक्ष उपराडे यांनी उपसभापतिपदासाठी नूतनलाल सोनवणे यांच्या नावाचा व्हिप जारी केला. नाव जाहीर होताच शर्यतीत असलेले संदीप कापगते यांनी कुणालाही कळू न देता आपला उमेदवारी अर्ज सादर केला. त्यांच्या उमेदवारीला पक्षाचा आदेश धुडकावून शालिनी तेजराम डोंगरवार, कुंदा रवींद्र लोगडे यांनी व वंचितचे सविता कोडापे यांनी पाठिंबा दिला.