Cooperative sector’s support for agriculture : डॉ. संतोष कोरपे यांची माहिती; आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त संवाद यात्रा
Akola सहकारातच समृद्धीचा पाया असून, शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता मिळाली पाहिजे. सेवा सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातून केवळ शेती नव्हे, तर जोड उद्योगालाही चालना मिळू शकते, ज्यामुळे आर्थिक सुबत्ता साधता येईल. शाश्वत शेती उत्पादन वाढीसाठी बँकेने अत्यल्प व्याजदरात जलसिंचन कर्ज उपलब्ध करून दिले आहे. त्याचा शेतकऱ्यांनी फायदा घेण्याची गरज आहे, असं अकोला जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोष कोरपे म्हणाले.
आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त त्यांनी सहकार क्षेत्राचा शेती आणि जोडधंद्यांना मिळत असलेल्या सहकार्याविषयी माहिती दिली. सेवा सहकारी सोसायट्यांच्या बळकटीकरणाच्या दिशेने राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांतर्गत जवळा, डाबकी आणि दुधलम येथील सेवा सहकारी सोसायट्यांमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
Anup Dhotre, Randhir Sawarkar : वाजतगाजत निघाली नेत्यांची मिरवणूक!
डॉ. कोरपे म्हणाले, “१०० वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी सहकाराची निर्मिती करून शेतीला गती देण्याचे कार्य केले. आता केंद्र व राज्य सरकारही सहकार क्षेत्राला पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील आहे. सहकाराच्या बळकटीकरणासाठी नवीन धोरण आखले असून, त्याअंतर्गत अनुदानाच्या माध्यमातून आवश्यक साहित्यही उपलब्ध करून दिले जात आहे.”
दुधलम येथील सेवा सहकारी सोसायटीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन डॉ. संतोष कोरपे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महल्ले, जवळा सोसायटीचे अध्यक्ष गजानन गावंडे, डाबकी सोसायटीचे अध्यक्ष प्रल्हाद पडोळे, उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, नीळकंठ खेडकर आणि प्रभाकर राऊत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Chandrashekhar Bawankule : सिंचन आणि पुनर्वसनाची कामे Pending ठेवू नका!
डॉ. कोरपे म्हणाले, “अनेक सोसायट्यांकडे स्वतःची इमारत नाही, मात्र नवीन इमारतीसाठी अल्पदरात कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. जिल्हा बँकेकडून १ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येत असून, काही सोसायट्यांनी याचा लाभ घेतला आहे. शाश्वत शेती उत्पादन वाढीसाठी बँकेने अत्यल्प व्याजदरात जलसिंचन कर्ज उपलब्ध करून दिले आहे, ज्याचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा.”
डॉ. कोरपे यांनी युवकांना सहकाराच्या माध्यमातून पुढे येण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “सोसायट्यांच्या इमारती उभारून केवळ शेतीच नव्हे, तर अन्य जोड उद्योग सुरू केल्यास गावांचा आणि पर्यायाने जिल्ह्यांचा विकास शक्य आहे. यात काहीसा विलंब होईल, पण अशक्य नाही. पुढील दोन-तीन वर्षांत सहकाराच्या माध्यमातून विकासाचे मूर्त स्वरूप साकारले जाईल.”