Breaking

Akola Crime Branch : आंतरराज्यीय ऑनलाइन सट्टेबाजीच्या रॅकेटचा पर्दाफाश

Interstate online betting racket busted : गुन्हे शाखेची कारवाई; २८.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त, ३३ आरोपींना अटक

Akola क्रिकेट व अन्य क्रीडा स्पर्धांवर ऑनलाइन सट्टा लावणाऱ्या आणि त्यासाठी बनावट आयडी तयार करणाऱ्या अंतरराज्यीय टोळीवर अकोला स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली. या कारवाईत एकूण ३३ आरोपींना अटक करण्यात आली असून २८,३६,२६५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांना गोपनीय माहिती मिळाली होती. बार्शीटाकळी पोलीस ठाणे हद्दीतील येवता-कालखेड रस्त्यावरील कातखेड शिवारात असलेल्या एका तीन मजली इमारतीत मोठ्या प्रमाणात ऑनलाइन सट्टा सुरु असल्याचे समजले. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी छापा टाकून ३३ आरोपींना ताब्यात घेतले.

Ramdas Athawale : मलकापुरातून आठवले फुंकणार रणशिंग!

आरोपींनी Fairplay (https://admin.fairplay24.in/login) आणि 100 Panel Depos0241 (100panel.com/login) या वेबसाईट्सचा वापर करून क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, टेबल टेनिस, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कॅसिनो गेम आणि इतर ऑनलाइन गेमिंगसाठी सोशल मीडियावर जाहिराती केल्या. व्हॉट्सअॅप व टेलिग्रामच्या माध्यमातून ग्राहकांना संपर्क करून ऑनलाइन पेमेंटद्वारे बेटिंग आयडी तयार करून दिले जात होते. जिंकलेल्या किंवा हरलेल्या पैशांची देवाणघेवाण डिजिटल माध्यमातून केली जात होती.

या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी ६ गुजरातमधील, ३ उत्तर प्रदेशातील, १ बिहारमधील, १ मध्य प्रदेशातील, ८ महाराष्ट्रातील (चंद्रपूर, पुणे, मुंबई, अमरावती, बुलढाणा) आणि १४ अकोला जिल्ह्यातील आहेत.

Chikhali Court : जवानावर हात उचलणाऱ्याला सश्रम कारावास!

या कारवाईत १२ लॅपटॉप (किंमत – ₹३,३०,०००), ११३ मोबाईल (किंमत – ₹१३,८५,०००), १० बँक पासबुक, २ पासपोर्ट, १३ एटीएम कार्ड, १२ वायफाय राउटर्स आणि मोडेम (एअरटेल, जिओ) तसेच १, २९,००० रुपयांचे जुगार साहित्य आणि बँक खात्यात गोठवलेले ९,९२,२६२ रुपये जप्त करण्यात आले. एकूण २८,३६,२६५ मुद्देमाल जप्त करण्यात आला.

प्राथमिक चौकशीत असे समोर आले आहे की, येवता रोडवरील ही जागा रविंद्र विष्णुपंत पांडे (वय ६३, रा. कातखेड) यांनी संजय गुप्ता व मोनीश गुप्ता यांना भाड्याने दिली होती. मोनीश गुप्ता व संजय गुप्ता यांनी फरार आरोपी महेश डिककर (रा. लोहारी, ता. अकोट) यांच्या मदतीने हा सट्टा व्यवसाय सुरू केला. त्यांनी आरोपींना मोबाईल, लॅपटॉप, वायफाय सुविधा आणि बोगस बँक खाती पुरवली.