Process to solve complexities in criminal cases : तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेत सविस्तर चर्चा
Wardha फॉरेन्सिक ओडोन्टोलॉजीमुळे दात व दंतखुणांच्या आधारे कायदेशीर तपासयंत्रणा अधिक शास्त्रशुद्ध, विश्वसनीय आणि गतिशील झाल्या आहेत, असे मत औरंगाबाद येथील डॉ. जे. ऑगस्टीन यांनी व्यक्त केले. सावंगी (मेघे) येथील शरद पवार दंत महाविद्यालयात आयोजित फॉरेन्सिक ओडोन्टोलॉजी या विषयावरील तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते.
दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठ आणि इंडियन असोसिएशन ऑफ फॉरेन्सिक ओडोन्टोलॉजी यांच्या सहकार्याने दंत व्यावसायिकांसाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. डॉ. अक्षय ढोबळे यांनी फॉरेन्सिक ओडोन्टोलॉजीमधील दंतवय अंदाज पद्धतींची ओळख करून दिली. दुसऱ्या दिवशी डॉ. जयशंकर पिल्लई यांनी ‘वंश निश्चितीसाठी दंत मानववंशशास्त्र’ या विषयाची मांडणी केली. एखाद्या व्यक्तीच्या वंशाचा शोध घेण्यामध्ये दंत वैशिष्ट्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचं ते म्हणाले.
डॉ. अर्जुन कुंडू यांनी ‘फॉरेन्सिक फेशियल रिकन्स्ट्रक्शन’ या विषयावरील सत्रात सांगाड्याच्या अवशेषांपासून चेहऱ्यावरील वैशिष्ट्यांची पुनर्रचना करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतींबाबाबत मार्गदर्शन केले. तिसऱ्या दिवशी डॉ. जगदीश राजगुरू (भुवनेश्वर, ओरिसा) यांनी ‘फॉरेन्सिक ओडोन्टोलॉजीमधील लिंग निर्धारण’ या विषयावर मार्गदर्शन केले.
CM DEVENDRA FADNAVIS: पायाभूत सुविधांच्या विकासात गडकरींचे योगदान मोठे !
दंतशाखेत न्यायसंबंधित तपासकार्यात तसेच गुन्हेगारी प्रकरणातील गुंतागुंत सोडवण्यासाठी दंत पुराव्यांचा वापर करण्याबाबत साहाय्यभूत ठरलेल्या या कार्यशाळेत विदर्भातील विविध महाविद्यालयांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या कार्यशाळेने आंतरविद्याशाखीय शिक्षणासाठी एक नवीन मानक स्थापित केले, तसेच सहभागींना व्यावहारिक कौशल्ये प्रदान करण्यासोबतच अभ्यासक्रमांसाठी एक मॉडेलही निर्माण केले.
कार्यक्रमाला डॉ. राजीव बोरले, इंडियन असोसिएशन ऑफ फॉरेन्सिक ओडोन्टोलॉजीचे सचिव डॉ. जयशंकर पी. पिल्लई (अहमदाबाद), विशेषज्ञ डॉ. अर्जुन कुंडू (गांधीनगर, गुजरात), डॉ. अक्षय ढोबळे (नागपूर), अधिष्ठाता डॉ. मनोज चांडक, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. विद्या लोहे, ओरल ऑन्कोलॉजी विभागाच्या संचालक डॉ. मीनल चौधरी, मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंजली बोरले, डॉ. अलका हांडे उपस्थिती होत्या.