Breaking

Iran Israel War: विमान प्रवास, पेट्रोलच्या किंमती सह महागाई वाढणार, कामगारांवरही मोठे संकट

Iran-Israel war a big blow, to face big challenges : इराण-इस्रायल युध्दाचा मोठा फटका, करावा लागेल मोठ्या आव्हानांचा सामना

New delhi : इराण आणि इस्रायलमध्ये भयंकर युद्ध सुरू झाले आहे. इराणमध्ये विध्वंस होताना दिसत असून, तीन दिवसांत 244 नागरिकांचा मृत्यू तर, 1200 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मध्य पूर्वमध्ये सुरू असलेलं हे युद्ध केवळ दोन देशांमध्ये राहिलं नाही तर त्याचा संपूर्ण जगावर व्यापक परिणाम होणार आहे. युध्दाचा मोठा फटका, सगळ्या जागा सोबत भारतालाही करावा लागणार आहे. त्यामुळे सोने सध्याच महागले आहे. शेअर बाजार कोसळला आता विमान प्रवास, पेट्रोलच्या किंमती सह महागाई वाढण्यासोबतच, कामगारांवरही मोठे संकट येण्याचा धोका आहे.

इस्त्रायलनं इराणवर तिसऱ्या दिवशी हल्ले सुरु ठेवले इस्त्रायलनं इराणच्या संरक्षण मंत्रालयावर हल्ला केल्याचा दावा केला. इराणची राजधानी तेरहानमध्ये देखील हल्ले केल्याचा दावा इस्त्यालनं केला आहे. इराणमध्ये रहिवासी हल्ले झाले आहेत.
याच दरम्यान आता इराणचं पारडं जड होताना दिसत आहे. अमेरिकेचा नंबर एकचा शत्रू असलेल्या चीनने या वादात आता इराणची बाजू घेतली आहे. इस्रायलकडूनची कारवाई विनाशकारी असल्याचं चीनने म्हटलं आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांना फोन केला आहे. यावेळी चीनने इस्रायलकडून सुरू असलेल्या कारवाईचा निषेध करत ही कारवाई चुकीची असल्याचं म्हटलं आहे.

Pankaja Munde : बच्चू कडूंना वेगळे भेटण्याचे कारण नाही

या युद्धाचा भारतावरही मोठा परिणाम होणार असल्याचे दिसत आहे. भारत आणि पाकिस्तानच्या युद्धानंतर भारतासाठी पाकिस्तानचे हवाई क्षेत्र बंद आहे. दरम्यान इराक आणि इराणचे हवाई क्षेत्र हे बंद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर युरोप, अमेरिका किंवा कॅनडाला जाणाऱ्या कोणत्याही भारतीय विमानाला मोठा वळसा घालून जावे लागेल.परिणामी युद्धाचा मोठा फटका हवाई प्रवासाला बसू शकतो. यात विमान भाडे वाढण्याची शक्यता आहे .

इराण इस्रायल युद्ध सुरू झाल्यापासून कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. केवळ दोन दिवसांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते की कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे .जर इराण इजराइल युद्ध असेच सुरू राहिले तर कच्च्या तेलाच्या किमती आठ ते नऊ टक्क्यांनी वाढवू शकतात असा तज्ञांचा अंदाज आहे. या परिस्थितीत भारताच्या आयात खर्चात वाढ होऊ शकते.

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जगातील 20% तेल व्यापार होतो .ही सामुद्रधुनी उत्तरेला इराण आणि दक्षिणेला अरबस्थानशी जोडली गेली आहे .इराण आणि इज्रायलच्या युद्धामुळे जर या मार्गात अडथळे आले तर इराक,सौदी अरेबिया आणि युएईमधून येणारा तेल पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे .असे झाले तर भारताला तेल आयात करणे कठीण जाईल ज्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढतील अशी भीती व्यक्त होत आहे .

इराण इज्रायल युद्ध लवकर संपलं नाही तर डॉलरची मागणी वाढेल असं तज्ञांचे मत आहे. असे झाले तर भारतीय रुपयावर थेट दबाव वाढेल. हा दबाव वाढल्याने देशाच्या व्यापार तुटीत व चालू खात्यातील तुटीवरही याचा परिणाम होऊ शकतो रुपयाचे मूल्य कमी झाले तर खरेदी करत असलेल्या वस्तू अधिक महाग होतील.

Ashish shelar : मोठया गणेशमुर्ती विसर्जनाबाबत ३० तारखेपर्यंत भूमिका मांडू

भारतातील सुमारे एक कोटी लोक कामासाठी आखाती देशांमध्ये जातात .गेल्या वर्षभरात आखाती देशात कामासाठी गेलेल्या कामगारांनी 45 अब्ज डॉलर भारतात पाठवले .हे भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर होते .मात्र इराण इस्रायल युद्ध आणखी भडकले तर अशा परिस्थितीत तब्बल एक कोटींहून अधिक कामगारांचे काम धोक्यात येईल. ज्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला फटका बसेल. अशी भीती ही व्यक्त केली जात आहे.