Irregularities in Voter Lists : मृत्यूनंतरही पंधरा वर्षे मतदार यादीत नाव

Name Remains on Voter List Even 15 Years After Death : मतदार याद्यांतील घोळ, ५,२९१ मृतांचा समावेश

Buldhana बुलढाणा व मोताळा तालुक्यांतील मतदार याद्यांमध्ये ७,४०० लोकांची नावे दुबार आहेत आणि ५,२९१ मृत्यू झालेल्या नागरिकांची नावे याद्यांमध्ये आजही कायम आहेत, असा दावा शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार या बोगस मतदारांमुळेच महायुतीचा उमेदवार बुलढाण्यात विजयी झाला.
शिवसेनेने पत्रकार परिषद घेऊन मतदार याद्या सादर केल्या. “आमच्याकडे अनेक मृत मतदारांचे मृत्यूचे दाखले उपलब्ध आहेत. बोगस मतदारांमधील मतचोरीमुळे मला अवघ्या ८४१ मतांनी पराभव स्वीकारावा लागला,” असाही दावा करण्यात आला.
त्यांनी मतदार याद्यांतील अनेक गंभीर त्रुटींचा उल्लेख केला. मृत मतदारांची नावे, मतदारांच्या पत्त्यांची अनुपस्थिती किंवा चुकीचे पत्ते, एकाच व्यक्तीची नावे अनेक ठिकाणी आढळणे, महिलेच्या जागी पुरुषाचा फोटो आढळणे, तसेच मतदार यादीत इतर गावांची नावे दिसणे, याचाही उल्लेख करण्यात आला.

Sampada Munde Scicide case : डॉ. संपदा मुंडेंना न्याय मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही!

सुंदरखेडमधील भाग क्रमांक २६१ मध्ये एका मतदाराचा मृत्यू २०१० मध्ये नोंदलेला असूनही पंधरा वर्षांनंतरही त्यांचे नाव यादीत कायम आहे. २००४ साली सरदारसिंग देवसिंग गायकवाड राजपूत यांचे निधन झाले; त्यांचे नाव २१ वर्षांनंतरही यादीत असल्याचे दाखले सादर करण्यात आले.

महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल, अशी अपेक्षा असूनही ९०,८१९ मते मिळूनही पराभव स्वीकारावा लागला. पुढे त्यांनी या पराभवाचे कारण शोधले तेव्हा मतदार याद्यांतील घोळ समोर आला, असाही दावा शिवसेनेने केला. ५,२९१ मतदार मयत असून, २,२९१ मृत मतदारांची नावे आमच्याकडे प्रती म्हणून प्राप्त झालेली आहेत आणि त्यांच्या मृत्यूचे दाखलेही आहेत, असेही ठाकरे गटाच्या नेत्यांनी म्हटले.