Sanjay Rauts warning to go to the Supreme Court : संजय राऊतांचा सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा
New Delhi : माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला दिलेला तडकाफडकी राजीनामा आणि त्यानंतरचा त्यांचा सार्वजनिक अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विरोधकांनी केंद्र सरकारवर सातत्याने निशाणा साधत या राजीनाम्यामागील खरी कारणे उघड करण्याची मागणी केली आहे.
आज पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी धनखड यांच्या अनुपस्थितीवरून सरकारवर जोरदार टीका केली. “21 जुलैनंतर धनखड दिसलेच नाहीत. ते बरे आहेत का? कुठे आहेत? त्यांची प्रकृती उत्तम होती, मग अचानक राजीनामा का दिला? ते चीन किंवा रशियात तर नाहीत ना?” असे सलग प्रश्न राऊतांनी उपस्थित केले.
Sharad Pawar : शरद पवारांचं एकनाथ शिंदेच्या दिल्ली भेटीवर गूढ वक्तव्य
राऊत यांनी पुढे टोला लगावत सांगितले, “लोक मिळेनासे झाले की सुप्रीम कोर्टात हेबियस कॉर्पस याचिका दाखल करावी लागते. कपिल सिब्बल यांच्याशी चर्चा झाली असून, माजी उपराष्ट्रपतींना शोधण्यासाठी अशी याचिका दाखल करावी, असा आमचा विचार आहे.” या वक्तव्यामुळे विरोधक खरंच सुप्रीम कोर्टात जाणार का, यावर राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
Ravikant Tupkar : अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीच्या श्रेयवादात आता तुपकरांची एन्ट्री!
धनखड यांनी 21 जुलै रोजी तब्येतीच्या कारणास्तव राजीनामा दिला होता, जो तात्काळ मंजूरही करण्यात आला. मात्र त्यानंतर त्यांचे कोणतेही सार्वजनिक दर्शन न झाल्याने आणि राजीनाम्याभोवतीचे गूढ अधिक गडद झाल्याने, हा मुद्दा पुन्हा राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे.