Is BJP’s decision in Pune to preserve religious faith or to balance votes : भाजपसाठी जैन समाज नव्हे, तर निवडणुका महत्वाच्या
Nagpur : पुण्यातील जैन बोर्डींग हाऊसच्या जागेच्या विक्री व्यवहारावरून महाराष्ट्राने भाजपचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांच्यातील संघर्ष बघितला. निर्णय आपल्याच बाजूने होईल, हे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर धंगेकर दोन दिवस शांत बसले. या दोन दिवसांत निर्णय झाला नसता तर पुढील संघर्ष अटळ होता. पण निर्णय धंगेकरांच्या बाजुने लागला, हे चांगलंच झालं. पण येथे भाजपच्या भूमिकेवर मात्र प्रश्नचिन्ह उभे झाले. ते म्हणजे हा निर्णय धार्मीक आस्था जपण्यासाठी की मतांची समीकरणे जुळवण्यासाठी?
जैन बोर्डींग हाऊसच्या निर्णयामागचा राजकीय हेतू आता स्पष्ट दिसू लागला आहे. जैन समाजाने यासंदर्भात पहिल्यांदा आवाज उठवला होता, तेव्हा भाजप शांत होती. त्यावेळी ना नेत्यांनी भेट घेतली, ना ठोस भूमिका मांडली. मात्र आता निवडणुका जवळ आल्यानंतर भाजपने अचानक हालचाल केली. त्यामुळे समाजात शंका निर्माण झाली आहे. भाजपच्या या हालचीलीमध्ये धार्मीक प्रश्नापेक्षा राजकीय दबाव अधिक दिसतो आहे, असे राजकीय विश्र्लेषकांचेही म्हणणे आहे.
Local body election : स्थानिक स्वराज्य निवडणुकांत विरोधकांचा सुफडासाफ करा
कॅल्क्यूलेटेड पाऊल..
गेल्या काही वर्षांत जैन समाजात असंतोष वाढला होता. अनेकवेळा निवेदन देऊन झाली, निदर्शनेही झाली. पण कोणतीच ठोस कारवाई मात्र झाली नाही आणि आता निवडणुकीच्या तोंडावर या प्रश्नावर ‘तातडी’ दाखवली गेली. हा निव्वळ योगायोग नाही, तर निवडणुकीच्या दृष्टीने मतांची समीकरणे साधण्यासाठी टाकलेले ‘कॅल्क्यूलेटेड पाऊल’ आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. स्थानिक पातळीवर जैन समाजाची मतसंख्या लक्षणीय आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिका निवडणुकीत ही मतं निर्णायक ठरू शकतात आणि भाजपला हे राजकीय गणित चांगलंच माहिती आहे. त्यामुळेच समाजाच्या भावना जपण्याची वेळ त्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर साधली आहे.
राजकीय उपयोग..
पुण्यात उद्भवलेला जैन बोर्डींग हाऊसचा प्रश्न धार्मिक आणि भावनिक आहे. तो कोणत्याही राजकीय पक्षाच्या निवडणुकीतील फायद्यासाठी नाही. समाजाचा राजकीय उपयोग केला जात असेल तर याचा भडका उडाल्याशिवाय राहणार नाही. भाजपसाठी समाज नाही तर निवडणुका महत्वाच्या आहेत, हा जैन समाजाचा पक्का समज झालेला आहे. त्यामुळे हा निर्णय घेतल्यानंतरही भाजपला आगामी निवडणुकांमध्ये त्याचा किती फायदा होईल, हा प्रश्न कायम आहेच.
Sandip Joshi : देवेंद्र फडणवीसांचं ‘ते’ स्वप्नं २५ वर्षांनंतर झालं साकार !
निवडणुकीनंतर दिसेल खरं रुप..
भाजपला जर खरंच जैन धर्मीयांचा प्रश्न सोडवायचा होता, तर तो जैन समाजाने पहिल्यांदा आवाज उठवला तेव्हाच का नाही सोडवला? आज दाखवली जाणारी संवेदनशीलता ही धार्मीक आहे की राजकीय, असे प्रश्न कुणालाही न पडले तर नवलच. निवडणुकीनंतर या कृतीचं खरं रूप दिसेल, हे पुणेकरांचं मत मात्र पक्क झालेलं आहे.








