Contractor aggressive over outstanding payments : सरकारच्या कारभारावर टीकेची झोड; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Buldhana जलस्वराज, जलजीवन मिशन, ग्रामविकास, जलसंपदा अशा महत्त्वाच्या योजनांत कामे पूर्ण करूनही गेल्या आठ महिन्यांपासून थकीत देयके न मिळाल्याने बुलढाणा जिल्ह्यातील कंत्राटदार आक्रमक झाले आहेत. तब्बल १३५ कोटी रुपयांचे थकीत बिले प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेने दिली. या पार्श्वभूमीवर संघटनेतर्फे जिजामाता प्रेक्षागृह परिसरात जोरदार आंदोलन करण्यात आले आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
कंत्राटदारांच्या म्हणण्यानुसार, राज्यात थकीत देयकांमुळे विकासकामे ठप्प झाली आहेत. मार्च महिन्यात अवघा ३ टक्के निधी मिळाल्यानंतर कोणताही निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे पाणीपुरवठा, रस्ते, जलसंधारण, ग्रामविकास यांसारखी कामे रखडली असून, अभियंते, मजूर, पुरवठादार आणि हातावर पोट असलेल्या कामगारांचा उदरनिर्वाह धोक्यात आला आहे.
Bad Roads : तिन किलोमीटरसाठी मारावा लागतो १८ किलोमीटरचा फेरा !
संघटनेचे जिल्हाध्यक्ष अभय इंगळे यांनी सांगितले की, “शासन निधी देत नसतानाही आमच्यावर दबाव टाकून कामे सुरू ठेवण्यास भाग पाडले जाते. त्यामुळे कंत्राटदार आर्थिक संकटात सापडले आहेत.”
संघटनेच्या प्रमुख मागण्या:
थकीत देयके तातडीने अदा करावीत
मुदतवाढीबाबत तात्काळ निर्णय घ्यावा
प्रशासकीय दिरंगाई दूर करून विकासकामांना गती द्यावी
कंत्राटदारांनी इशारा दिला आहे की, निधीअभावी थांबलेली विकासकामे पुन्हा सुरू करण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घेतला नाही, तर पाणीपुरवठा व विकासयंत्रणेचा पूर्ण बोजवारा उडेल.








