Over 200 tourists from Nagpur still stranded in Jammu and Kashmir, but safe : प्रशासनाशी झाला संपर्क, परत आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू
Nagpur : जम्मू – काश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. तेव्हा नागपुरातील २०० पेक्षा जास्त पर्यटक तेथे होते. यांतील काही जण किरकोळ जखमी झाले आहेत. अद्यापही हे लोक तेथेच अडकून आहेत. पण सर्व जण सुरक्षीत आहेत. नागपूर जिल्हा प्रशासनाने त्यांच्याशी संपर्क साधला आहे आणि सर्वांना परत आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.
जम्मू – काश्मीर येथे नागपुरातून पर्यटनासाठी गेलेल्या लोकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. प्रशासनाने आतापर्यंत २२० पर्यटकांशी संपर्क साधला आहे. हे सर्वच जण सुरक्षीत आहेत आणि श्रीनगरमध्ये थांबले असल्याची माहिती आहे. मंगळवारी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ह्यात २८ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी झाले. मृतांचे पार्थीव विशेष विमानाने आणण्याचेही काम सुरू आहे. अडकलेल्या पर्यटकांसोबत जिल्हा प्रशासन सातत्याने संपर्क ठेऊन आहे.
Pehalgam terrorist attack : बुलडाण्यातील पाच जण पहेलगाममध्ये अडकले!
दहशतवादी हल्ल्यात किरकोळ जखमी झालेले काही पर्यटक नागपूरकडे निघाल्याचेही वृत्त हाती येत आहे. प्रशासनाने जाहिर केलेल्या क्रमांकावर अडकलेल्या लोकांचे नातेवाईक, मित्र संपर्क साधत आहेत. जवळपास सर्वांशीच संपर्क झाला असून ते सुरक्षीत आहेत. श्रीनगर येथील संपर्क क्रमांक ०१९४-२४६३६५१ हा आहे. तर व्हॉट्सअॅप क्रमांक ७७८०८०५१४४, ७७८०९३८३९७, ७००६०५८६२३ हे आहेत. तर नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील संपर्क क्रमांक ०७१२-२५६२६६८ हा आहे.