Jammu Kashmir terrorist attack : काश्मीरचं सौंदर्य घायाळ करणारं, पण आता ‘घायाळ’ व्हायला जाणार कोण ?

The beauty of Kashmir is hurtful, but who will be ‘hurt’ now : आणखी तीन दिवस तेथे असतो तर, सांगताना रचना कन्हेर यांचा उडाला थरकाप

Nagpur : जम्मू – काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर बरेच लोक आता आपापल्या गावी परतले आहेत. तर काही अजूनही परतीच्या प्रवासात आहेत. काही जण हल्ल्याच्या दोन – तीन दिवस आधी परतले. पण अजूनही त्या हल्ल्याने निर्माण केलेली दहशत लोकांच्या मनातून गेलेली नाही. नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यातील डीगडोह येथील रहिवासी रचना कन्हेर यांनी ‘सत्तावेध’ला काश्मीरमधील वास्तव सांगितलं.

रचना कन्हेर यांचा ४७ महिलांचा ग्रुप काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेला होता. हल्ल्याच्या तीन दिवस आधीच हा ग्रुप परत आला. त्यानंतर दहशतवादी हल्ला झाल्याचे कळताच ‘आणखी तीन दिवस तेथे असतो तर..’, असे सांगताना कन्हेर यांचा थरकाप उडाला. घटनेनंतर पहलगामचे व्हिडिओ, अपडेट्स सतत येत होते. हे सर्व मन सुन्न करणारं होतं. अगदी तीन दिवसांपूर्वी आपण पहलगामला होतो, हे आठवताच अंगावर काटा उभा राहिला. मग हल्ल्याच्या वेळी तेथे जे लोक होते, त्यांची परिस्थिती तेव्हा काय असेल, याचा अंदाजही न लावलेलाच बरा, असे त्या म्हणाल्या.

Jammu Kashmir terrorist attack : आतापर्यंत ५०० पर्यटक दाखल, अमरावती, अकोल्यातील पर्यटक आज येणार !

स्थानिकाने हाकलून लावले..
१० दिवसांच्या त्या प्रवासात एक गोष्ट नेहमी सलत होती. ती म्हणजे, रस्त्यांवर सतत सुरक्षा रक्षकांचा पहारा. हा बंदोबस्त बघून काश्मीरात आपण सुरक्षीत नाही, ही भावना सतत मनात रुंजी घालत होती. पण पहलगामला जेथे हल्ला झाला, तेथे सुरक्षा व्यवस्था नव्हती. रस्त्यांवर सुरक्षा रक्षक तैनात करताना पर्यटनस्थांवरही सुरक्षा असली पाहिजे. घटनास्थळी जर सुरक्षा रक्षक असते तर दहशतवाद्यांचा प्रतिकार करता आला असता, असे कन्हेर म्हणाल्या. एका शेताचे सौंदर्य खुपच मनमोहक होते. आमच्या बसमधील काही महिला सरसोच्या शेतात फोटो काढण्यासाठी गेल्या. तेव्हा तेथील एका स्थानिकाने त्यांना पळवून लावले. त्याचे म्हणणे होते की, ती जागा सुरक्षीत नाही. असे अनुभव वेळोवेळी आले.

बस मे कुछ रख दिया तो क्या करेंगे ?
आमच्या बसमध्ये एक स्थानिक शाल, मफलर विकायला आला. आपल्यासाठी बसमध्ये, रेल्वेमध्ये असे लोक येणं नवीन नाहीच. म्हणून आम्ही शाल बघायला लागलो. तर बसचा ड्रायव्हर त्या माणसावर जोरात ओरडला आणि त्याला बाहेर काढलं. आम्ही कारण विचारलं असता, ‘मॅडमजी आप लोक हमारी जिम्मेदारी हो. क्या पता कौन किस इरादे से बस मे आया है? बस मे कुछ रख दिया तो क्या करेंगे ?’, असे तो म्हणाला. म्हणजे त्याला बॉम्ब ठेवण्याबद्दल सुचवायचं होतं, असे रचना कन्हेर यांनी सांगितले. काही हॉटेल्समध्ये कर्मचारी रात्री – बेरात्री पैसे आणि आधार कार्ड मागायला येतात, असाही काही महिलांचा अनुभव असल्याचे त्या म्हणाल्या.

Amravati Airport : नामकरणाच्या मुद्यावरून पुन्हा वाद, सरकार कैचीत!

शंकेची पाल आणि सुरक्षेची पोल उघड..
हे अनुभव कधीच बाहेर सांगण्यात आले नसते. यापेक्षा काश्मिरचं सौंदर्य घायाळ करणारं आहे. तेच डोळ्यांत साठवून फोटो काढणे आणि रील्स बनवणे सुरू होते. पण आतुन काश्मीर आजही जळतंय, हे या हल्ल्याने प्रकर्षाने पुन्हा एकदा समोर आले. घायाळ करणारं सौंदर्य बघायला आता जाणार कोण, हाही प्रश्न आहेच. काश्मीरच्या बाबतीत मनात चुकचुकणारी पाल आणि सुरक्षा व्यवस्थेची पोल दोन्ही उघड झाल्याचे रचना कन्हेर म्हणाल्या.

  • अतुल मेहेरे (विशेष प्रतिनिधी)

    अमरावती विद्यापीठातून पत्रकारीतेची पदवी. २६ वर्षांपासून पत्रकारीतेमध्ये कार्यरत. सन २००० पासून लोकमत आणि सकाळ वृत्तपत्र समुहामध्ये विविध पदांवर कार्य केलेले आहे. दैनिक सकाळच्या सरकारनामा या वेब पोर्टलसाठी राजकीय प्रतिनिधी म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.