500 tourists arrive in Maharashtra from Kashmir, 232 tourists will arrive today : गरज पडल्यास उद्याही विशेष विमानाची व्यवस्था
Mumbai : जम्मू – काश्मीर येथे २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तेथे अडकलेल्या पर्यटकांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी कार्यवाही सुरू झाली होती. आतापर्यंत विशेष विमानांनी ५०० पर्यटकांना सुखरुप आणण्यात आले आहे. आज २३२ पर्यटकांना आणण्यासाठी आणखी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे.
राज्य सरकारने एअर इंडिया आणि इंडिगो अशा दोन विमानांची व्यवस्था पर्यटकांना आणण्यासाठी केली आहे. घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री गिरीश महाजन यांना तातडीने काश्मीरला पाठवले होते. त्यांच्याकडून मुख्यमंत्री तेथील स्थितीचा आढावा घेत आहेत. आणखी विमाने लागत असतील तर करा, त्याचा खर्च राज्य सरकार देईल, असेही फडणवीस यांनी सांगितले आहे.
Amravati Airport : नामकरणाच्या मुद्यावरून पुन्हा वाद, सरकार कैचीत!
काही पर्यटकांवर लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. मंत्री गिरीश महाजन यांनी तेथे त्यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्हिडिओ कॉलवर पर्यटकांशी संवाद साधला. जखमींवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशीही फडणवीसांनी संवाद साधला. आताही महाराष्ट्रातून नागरिकांच्या येणाऱ्या सुचना आणि विनंतीवर काम सुरू आहे. त्यासाठी मंत्रालय, मुख्यमंत्री कार्यालय आणि महाराष्ट्र सदनातील कक्ष अशी यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आली आहे.
Local Body Elections : काँग्रेसला झाली निवडणुकीची घाई; सरकारला इशारा
जम्मूतील कालिका धाम येथे काही पर्यटकांची राहण्याची व्यवस्था केली होती. तेथे अमरावतीचे १४ पर्यटक थांबले होते. काही पर्यटक आपाआपल्या व्यवस्थेने जम्मूवरून दिल्लीकडे रवाना झाल्याचीही माहिती आहे. त्यांची राहण्याची व्यवस्था दिल्ली येथे करण्यात आली आहे. आज काश्मीरातून येणाऱ्या विशेष विमानात अमरावती आणि अकोला येथील पर्यटक असणार आहेत. गरज पडल्यास उद्याही विशेष विमानाची व्यवस्था करण्यात येईल, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे.