Janshakti Shetkari Sanghatana : महिला आयपीएस अधिकाऱ्याला धमकावणे दादांना ‘धरण’ सारखे जड जाणार?

Threatening Woman IPS Officer to Cost Ajit Pawar : महिलेला धमकावणे शोभते का? अजित पवारांनी राजीनामा द्यावा !

Mumbai : ‘दादा’गिरी करत अवैध उत्खनन करत असलेल्या लोकांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महिला आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धमकावले. हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला. यानंतर विरोधक अजित पवारांवर हल्लाबोल करण्यासाठी सरसावले आहेत. लगेच उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी पवारांवर टिकेची झोड उठवली. त्यानंतर अंजली दमानिया यांनी अजित पवारांनी कृष्णा यांची माफी मागावी, अशी मागणी केली. तर आता जनशक्ती शेतकरी संघटनेने अजित पवरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

महिला आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांना धमकावण्याचे प्रकरण दादांना ‘धरण’ प्रकल्पासारखे जड जाणार, असं एकंदरीत सद्यस्थितीत सुरू असलेल्या घडामोडींवरून दिसतंय. काही वर्षांपूर्वी अजित दादा अशाच एका प्रकरणात चांगलेच अडचणीत आले होते. तेव्हा महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती होती. दरम्यान ‘धरणात पाणी नाही तर मी काय धरणात — का?’, असे वक्तव्य अजित दादांनी केले होते. तेव्हा त्यांना विरोधकांनी चांगलेच धारेवर धरले होते. त्यानंतर गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या वेळी ‘धरणाच्या वाक्याने माझं वाटोळं झालं..’, अशी कबुलीही अजित पवारांनी दिली होती. आता महिला आयपीएस अधिकाऱ्याला धमकावण्याच्या प्रकरणातही विरोधक दादांना इतक्या सहज सोडतील असं वाटत नाही.

Reservation controversy : माझी नाराजी मंत्र्यांवर नाही, जीआरमधल्या शब्दांवर

प्रक्ररण घडल्यानंतर लगेच दादांवर आरोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. जनशक्ती शेतकरी संघटनेचे अतुल खुपसे यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर महिला अधिकारी कारवाई करायला जातात आणि अजित पवारांचे कार्यकर्ते त्यांना वेढा घालतात व दादांना कॉल करतात. अजित पवार त्या अधिकाऱ्यालाच धमकावत ‘तुझ्यावरच कारवाई करीन..’, असं बजावतात. हे कितपत योग्य आहे? एकीकडे तुम्ही राज्यातील महिलांना लाडक्या बहीणी म्हणता. स्वतःला लाडक्या बहीणीचा लाडका भाऊ म्हणवून घेता आणि दुसरीकडे नवीन आयपीएस अधिकाऱ्यांना धमकावता, हे योग्य आहे का, असाही सवाल अतुल खुपसे यांनी केला आहे.