Minister Jayakumar Gores strong criticism of Ramraje Naik Nimbalka : मंत्री जयकुमार गोरेंचा रामराजें नाईक निंबाळकरांवर हल्लाबोल
Malshiras : कुस्तीत एखादा पैलवान कसाच हरत नसेल तर त्याच्या डोळ्यात माती टाकली जाते, नाहीतर त्याचा चावा घेतला जातो. शेवटी काहीच नाही जमले तर माय माऊलींना मध्ये घातले जाते. अरे तुमच्यात दम असेल तर मैदानात या ना
असे थेट आव्हान सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोर यांनी नाव न घेता रामराजे नाईक निंबाळकर यांना दिले. आज सलग दुसऱ्या दिवशी माळशिरसच्या दौऱ्यावर असलेल्या जयकुमार गोरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन झाले. यावेळी गोरे यांनी आजही त्यांना अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर थेट तोफ डागली.
मी सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरातला आणि एका रेशन दुकानदाराचा मुलगा आहे. मला जनतेच सुखदुःख कळते. कारण ते आम्हीही भोगले आहे, पाहिले आहे. वयाच्या 16 वर्षी मला पायात चप्पल घालायला मिळाली. मी कोणताही इतिहास अथवा भूगोल असणारा नेता नसून सोन्याचा चमचा कधीच पाहिला नाही. मात्र सोन्याचे चमचे तोंडात घेऊन जन्मलेल्यांनी कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरी या माय माऊली आणि जनता जनार्दन माझ्या पाठीशी असल्याने मला काही फरक पडत नाही असा टोला जयकुमार गोरे यांनी लगावला.
Ajit Pawar: ‘ नेमका कुठला निधी मिळाला नाही मी त्याला विचारतो,’
मला तुम्ही कोणतीही कामे सांगा अगदी तुमचा फ्युज बसवायचा असेल तरीही तो मी बसवायला तयार आहे असे गोरे म्हणाले. विकासाच्या वाटेत आड येणाऱ्या एखाद्याचा फ्युज काढायचा असेल तर तोही मी काढायला आलो आहे असा सज्जड दम देखील जयकुमार गोरे यांनी विरोधकांना दिला मंत्री जयकुमार गोरेंचा आणि रामराजें नाईक निंबाळकरांवर यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. यात आता घोड्यांनी निंबाळकरांवर नाव न घेता पण थेट टीका सुरू केल्याचे दिसून येत आहे. परमेश्वराच्या रुपाने आपणाला देवेंद्र पावले. मी माफ केलं म्हणून जेलमध्ये बसायचं वाचलात याची जाणीव ठेवा आता तरी सुधरा, नीट वागा. असेही जयकुमार गोरे म्हणाले.