Devendra Fadnavis should come with us to straighten out the Election Commission : अखेर त्यांनी मान्य केलंच की, मतदार याद्यांमध्ये धांदली होते
Mumbai : माझ्या जवळच्या एका मतदारसंघात घर क्रमांक ० आहे. काही घरांचे क्रमांक स्वप्लविराम, पूर्णविराम, ०० आणि ००० अशी आहेत. याशिवायही वेगवेगळी वर्गवारी आहे. एका घरात १८८ नावं, तर काही घरांत २०० नावं आहेत. आमचे सहकारी अशोक पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांंना सांगितलं की, ही सर्व नावे बोगस आहेत. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की, आता काही करता येऊ शकत नाही. हा किस्सा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी सांगितला.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या ज्या काही हालचाली सुरू आहेत, त्या पृष्ठभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी जयंत पाटील यांनीही पत्रपरिषदेला संबोधित केले. ते म्हणाले, मतदार याद्यांमध्ये बोगस नावे घुसवण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगाने राबवली. आता मतदारांनी बघायचे आहे की त्यांच्या घरातून किती नावं यादीमध्ये नोंदवली आहेत. कारण हे लोक पुढे घरांवर दावाही ठोकू शकतात.
Sharad Pawar : मी फडणवीसांना सांगितलं की, ‘ते’ आमच्या विचारांचे नाहीत !
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या नातेवाईकांची नावे दोन-दोन तीन-तीन ठिकाणी नोदवली गेल्याची बाब उजेडात आली आहे. त्यावर फडणवीसांनी राहुल गांधींना उत्तर मागितले आहे. यासंदर्भात विचारले असता, हे एक बरंच झालं की, फडणवीसांनी मान्य केलं की, मतदार याद्यांमध्ये धांदली होऊ शकते. त्यामुळे त्यांनी आता आमच्यासोबत यावं आणि आयोगाला ही बाब सांगावी. थोडक्यात आयोगाला सरळ करण्यासाठी त्यांनी आम्हाला साथ द्यावी, असे जयंत पाटील म्हणाले.
Local body election : राज्यातील महापालिकांची प्रभागरचना सोमवारी
याच पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं की, १८ ऑक्टोबर २०२४ ला आम्ही निवडणूक आयोगाला पत्र दिलं होतं. त्यानंतर पत्रकार परिषदही घेतली होती. तेव्हा आम्ही सांगितलं की सर्व्हर मॅनेज केले जात आहेत. मुळ मतदारांच्या जागी नवे मतदार आणले जात आहेत. याद्यांमध्ये घोळ करण्याचा कार्यक्रम सुरू असल्याचे तेव्हाच आम्ही आयोगाच्या निदर्शनास आणून दिले होते आणि आमची तक्रार निवडणुकीच्या नंतरची नाही तर आधीची आहे.
प्रभाग रचनासुद्धा सत्ताधाऱ्यांच्या मनमर्जीने केली जात आहे. आयुक्त हा सरकारी नोकर असतो. ठाण्यामध्ये २०१७ मध्ये नेत्यांच्या घरात बसून प्रभाग रचना केली गेली आहे. कुठलीही प्रभाग रचना करण्यासाठी अधिकाऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचा दबाव असतो, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.