Breaking

Jayashree Shelke : माजी आमदार शेळके म्हणाल्या, हे तर महाराष्ट्राचे दुर्दैव!

It is Maharashtra’s misfortune that farmers have to commit suicide for water : पाण्यासाठी शेतकऱ्याने आत्महत्या केल्यावरून आक्रमक

Buldhana महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा मोठा फटका बसत आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील शिवणी आरमाळ येथील शेतकरी कैलास नागरे यांनी पाण्याच्या टंचाईमुळे आत्महत्या केली. राज्यभर हळहळ व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या जयश्री शेळके यांनी सरकारवर टीका केली आहे. सत्ताधारी शेतकरी विरोधी आहेत. त्यांच्या हातात सत्ता देणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, अशी टीका त्यांनी केली.

‘सत्तेत बसलेल्यांना शेतकऱ्यांचे काहीही देणे-घेणे नाही. शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नाही. म्हणून त्यांना आत्महत्या करावी लागत आहे, यापेक्षा दुर्दैवी परिस्थिती कोणती असू शकते? राज्यभरातील अनेक प्रकल्पांमध्ये सत्ताधारी नेत्यांच्या निकटवर्तीय शेतकऱ्यांना पाणी पुरवले जात आहे. विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना डावलले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Bacchu Kadu : बच्चू कडूंनी भिंती, रस्ते रंगवून साजरी केली होळी!

देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा प्रकल्प आणि मोताळा तालुक्यातील नळगंगा धरण या दोन्ही ठिकाणी सारखीच परिस्थिती आहे. प्रकल्प शेजारच्या शेतकऱ्यांची हीच व्यथा आहे. सरकारने याबाबत गंभीर पावले उचलण्याची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

जयश्री शेळके यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. तसेच, पाणीपुरवठ्यातील भेदभाव थांबवून सर्व शेतकऱ्यांना समान हक्क द्यावेत, अशी भूमिका मांडली.

Local Body Elections : चिखली तालुक्यात निवडणुकीचे पडघम, उमेदवार लागले तयारीला

युवा शेतकरी कैलास नागरे यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विरोधी पक्षांकडून देखील सरकारवर हल्लाबोल करण्यात येत आहे. लवकरच या प्रकरणावर विधानसभेत आवाज उठवला जाण्याची शक्यता आहे.