Jharkhand liquor scam ; झारखंड दारू घोटाळ्यात शिंदेंच्या निकटवर्तीयाची अटक !

Sanjay Raut’s serious allegations, confirmed by Awhad : संजय राऊत यांचे गंभीर आरोप, आव्हाडांची पुष्टी

Mumbai : झारखंडमध्ये सुरू असलेल्या दारू घोटाळ्या प्रकरणी महाराष्ट्रातील सुमित फॅसिलिटी कंपनीचा संचालक अमित साळुंखे याला अटक करण्यात आली आहे. झारखंडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. अमित साळुंखे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या निकटवर्तीयांपैकी असल्याचा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

संजय राऊत यांनी गंभीर आरोप करत म्हटलं की, महाराष्ट्रात 800 कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा झाला आहे. यामध्ये 600 कोटींनी टेंडर वाढवण्यात आलं आणि हे पैसे थेट श्रीकांत शिंदे यांच्या मेडिकल फाऊंडेशनकडे वळवण्यात आले. या प्रकरणात अटक झालेला अमित साळुंखे श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनशी संबंधित आहे. झारखंडमध्ये दारू वितरणाच्या टेंडर प्रक्रियेत अनियमितता झाली असून त्यात सुमित फॅसिलिटी कंपनीने कमी दराने बोली लावून कंत्राट मिळवलं आणि नंतर आर्थिक गैरव्यवहार केले, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Dr. Punjabrao Deshmukh Agricultural University : धक्कादायक : PKV च्या ‘रुम्स भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे’

या घोटाळ्यात आतापर्यंत 11 जणांना अटक झाली आहे. हीच कंपनी महाराष्ट्रात 108 क्रमांकाच्या अ‍ॅम्ब्युलन्स सेवा देखील चालवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करून या अटकेबाबत माहिती दिली असून, या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून संपूर्ण तपास होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले आहे.