Breaking

Jitendra Awhad : सनातन धर्माने भारताचं वाटोळं केलं

Awhads statement sparks controversy Angry reaction from BJP : आव्हाडांच्या वक्तव्याने वाद; भाजपकडून संतप्त प्रतिक्रिया

Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सनातन धर्माने भारताचं वाटोळं केलं आणि होय, सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल अशा शब्दांत त्यांनी सनातन धर्मावर थेट टीका केली. त्यांच्या या विधानावर भाजपकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून माफीची मागणी केली जात आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सातही आरोपी निर्दोष सुटल्यानंतर काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी “ही घटना भगवा नव्हे, तर सनातनी दहशतवाद होती” अशी प्रतिक्रिया दिली होती. या विधानावरून सुरु झालेला वाद शिगेला पोहोचला असतानाच जितेंद्र आव्हाडांनी केलेले विधान नव्या वादाला कारणीभूत ठरत आहे.

आव्हाड म्हणाले की, सनातन धर्म नावाचा धर्मच नव्हता. हिंदू धर्म वेगळा आहे. आम्ही हिंदू धर्म मानतो. परंतु सनातन धर्म विकृत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारणारे, संभाजी महाराजांना बदनाम करणारे, संत तुकाराम, ज्ञानेश्वर, बसवेश्वर, बौद्ध भिक्खूंना छळणारे हे सगळे सनातनी दहशतवादीच होते.

 

Maharashtra politics : मराठीसाठी हिंसक होणारच! गोळ्या घालणार का?

तसेच त्यांनी समाज माध्यमावर पोस्ट करत स्पष्टपणे म्हटले, होय, सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल. तो आजचा नव्हे, तर हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे. जोपर्यंत वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था आहे, तोपर्यंत सनातनी दहशतवाद विसरता येणार नाही.
या विधानावर भाजपकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. भाजप आमदार राम कदम म्हणाले, शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांनी आपले संपूर्ण जीवन हिंदू धर्मासाठी दिलं. आणि आव्हाड त्यांच्याच नावाने सनातन धर्माला दोष देत आहेत. हे वक्तव्य गलिच्छ राजकारण आहे. श्रावण महिन्यात हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत.

Ministers threat : “कानाखाली मारीन, बडतर्फ करेल, चमचेगिरी करु नको”

 

आव्हाडांनी तात्काळ माफी मागावी. राजकारणात वादग्रस्त विधानांची मालिकाच सुरु असताना आव्हाडांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा धर्म, राजकारण आणि इतिहास या त्रिसंधीवर चर्चेचा भडका उडण्याची शक्यता आहे.