Job in Germany : जर्मनीत मिळणारी दहा हजार नोकऱ्यांची संधी हुकली,

Students hit, not a single candidate sent during year : विद्यार्थ्यांना फटका वर्षभरात एकही उमेदवार पाठवला गेला नाही

Mumbai: राज्यात बेरोजगारीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना परदेशात मिळणाऱ्या रोजगार संधींकडे राज्य सरकारकडून होत असलेल्या उदासीनतेमुळे थेट दहा हजार विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. 2024 साली महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ जर्मनीला पाठवण्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला होता.

उच्च व तंत्र शिक्षण, कौशल्य विकास, उद्योजकता, उद्योग, कृषी व वैद्यकीय शिक्षण विभागांच्या मार्फत विद्यार्थी तयार करून त्यांना जर्मनीमध्ये नोकरी देण्याची प्रक्रिया राबवण्याची जबाबदारी राज्य सरकारकडे होती. यासाठी तब्बल 70 कोटी निधीची तरतूद करून प्रशिक्षणापासून नियुक्तीपर्यंतची सर्व प्रक्रिया राबवण्याची तयारी होती.

मात्र निर्णयाला आता एक वर्ष पूर्ण होत असतानाही राज्य सरकारने एकाही विद्यार्थ्याला जर्मनीमध्ये पाठवले नसल्याची माहिती समोर येत आहे. विविध क्षेत्रांतील कुशल युवकांना करिअरची संधी मिळणार होती आणि दहा हजार विद्यार्थ्यांना परदेशी नोकरी देण्याचा मार्ग मोकळा झाला होता, तरीही राज्य सरकारच्या अनास्थेमुळे संपूर्ण योजना कागदोपत्रीच राहिली आहे.

Local Body Elections : महापालिका निवडणूक तयारीचा वेगाने आढावा

बेरोजगारीची समस्या वाढत असताना अधिकाऱ्यांच्या या दुर्लक्षावरून सरकारवर टीका होत असून विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणात नोकरीसाठी आवश्यक निवड व प्रक्रिया पुढे न सरकल्याने जर्मनीकडील अधिकाऱ्यांनी थेट राज्य सरकारशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यासाठी जर्मनीतील मंत्री व संबंधित अधिकारी मुंबईत येत आहेत.

Repo rate : गृहकर्ज आणि वाहन कर्जधारकांसाठी दिलासादायक निर्णय

या संधीचे दरवाजे बंद होऊ नयेत म्हणून सरकारी मान्यताप्राप्त रिक्रूटमेंट एजंटने विद्यार्थ्यांना तातडीने पाठवण्याची मागणी केली आहे. प्रशासन लवकर निर्णय घेईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. परंतु राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया न आल्याने या संपूर्ण प्रकरणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. परदेशात करिअरची संधी उपलब्ध असताना सरकारने इतकी उदासीनता का दाखवली, याबाबत आता विद्यार्थी, पालक आणि रोजगार तज्ञांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

___