Amravati’s son will be The 52nd Chief Justice of India : न्या. भूषण गवईंचा शपथविधी सोहळा १४ मे रोजी
Amravati अमरावतीचे सुपूत्र आणि सुप्रीम कोर्टाचे Supreme Court विद्यमान न्यायमूर्ती भूषण गवई हे येत्या १४ मे रोजी भारताचे ५२वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिल्लीतील कार्यक्रमात त्यांना शपथ oath ceremony दिली जाणार आहे. यावेळी त्यांच्या कुटुंबियांसह मित्रमंडळीही उपस्थित राहणार आहेत.
भूषण गवई हे केरळ आणि बिहारचे माजी राज्यपाल दिवंगत रा. सु. उर्फ दादासाहेब गवई यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. त्यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९६० रोजी अमरावती येथे झाला. अत्यंत साधी राहणी आणि सहज वागणूक असलेले गवई यांचे सामान्यांशी नेहमीच आत्मीय संबंध राहिले आहेत. आजही अमरावतीला आले असता ते सुरक्षाव्यवस्थेच्या चौकटीत असूनही नातेवाइक व मित्रपरिवाराशी मुक्तपणे संवाद साधतात.
शपथविधीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या मातोश्री डॉ. कमलताई गवई यांनी भावना व्यक्त केली. “मी दिल्लीला जाणार आहे. माझं विमानाचं तिकीट मिळालं आहे. नागपूरहून आणखी काही लोक सोबत जाणार आहेत,” असं त्या म्हणाल्या. गवई यांच्या पत्नीचे नाव तेजस्विनी, तर मुलाचे नाव ज्योतिरादित्य आहे. भूषण गवई यांचा सरन्यायाधीशपदाचा प्रवास केवळ अमरावतीच नव्हे तर महाराष्ट्रासाठीही गौरवाची बाब आहे.
Shweta Mahale : बुलढाण्यातही आमदारांच्या घरापुढे पेटवले टेंभे!
भूषण गवई यांची न्याय क्षेत्रातील उल्लेखनीय कारकीर्द
१६ मार्च १९८५ रोजी वकिली व्यवसायास प्रारंभ.
१९८५–१९८७ दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाचे माजी महाधिवक्ता राजा भोसले यांच्यासोबत काम.
१९८७ ते १९९० दरम्यान स्वतंत्र वकिली.
१९९० नंतर नागपूर खंडपीठात प्रामुख्याने वकिली.
अमरावती महापालिका व विद्यापीठांचे स्थायी वकील.
१९९३–१९९७ दरम्यान सहायक व अतिरिक्त सरकारी वकील.
१७ जानेवारी २००० रोजी सरकारी वकील म्हणून नियुक्ती.
१४ नोव्हेंबर २००३ रोजी उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून पदोन्नती.
१२ नोव्हेंबर २००५ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश.
नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पणजी येथे न्यायाधीश म्हणून सेवा.
२४ मे २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती.