Kadam Vs Parab : मी नार्को टेस्टसाठी तयार आहे, पण आता कोर्टातच उत्तर देईन

Ramdas Kadam is angry over Anil Parab’s allegations. : अनिल परबांच्या आरोपांवर रामदास कदम संतापले

Mumbai : ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी माजी मंत्री रामदास कदम यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर आता रामदास कदम यांनी जोरदार पलटवार केला आहे. परबांच्या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या कदम यांनी अनिल परब यांच्याविरोधात कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

कदम म्हणाले, “अनिल परब यांनी माझ्या कुटुंबाची बदनामी केली आहे. माझी पत्नीच परबांविरोधात कोर्टात जाणार आहे. त्यावेळी काय घडलं, हे परबांना माहीत आहे का? माझी नार्को टेस्ट घ्या, मी आजही तयार आहे. जर माझ्या बोलण्यात तथ्य नसेल, तर तुम्ही ठरवा मला कोणती शिक्षा द्यायची.”

रामदास कदम म्हणाले, “माझी पत्नी दोन स्टोव्हवर स्वयंपाक करत होती. साडीला आग लागून मोठा भडका उडाला. मी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि माझे हात भाजले. सहा महिने ती जसलोक रुग्णालयात दाखल होती. मीही तिथेच होतो. आजही आम्ही जीवाभावाने संसार करतो आहोत. मग तू काय सांगतोस? अशा प्रकारे तू बदनामी केली आहेस. यावर मी थेट मानहानीचा दावा दाखल करणार आहे.”

Local body election : दिवाळीनंतर आचारसंहिता; शेवटी महानगरपालिका !

कदम म्हणाले, “बाळासाहेब ठाकरेंचा विषय कोर्टात जावा हे मला कधीच पटत नव्हतं. पण जर तू मला आणि डॉक्टरांना खोटं ठरवतोस, तर मग मी कोर्टात जाईनच. मी सीबीआय चौकशीची मागणी करणार आहे. तुला कावीळ झाली आहे, म्हणून तुला काही दिसत नाही,” असा टोला त्यांनी परबांना लगावला.

Kadam Vs Parab : रामदास कदमांच्या बायकोने जाळून घेतलं की तिला जाळलं?

शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी नुकत्याच केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण तापले होते. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाबाबत केलेले दावे चर्चेत आले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी 1993 साली कदम यांच्या पत्नीच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त करत कदमांची नार्को टेस्ट व्हावी अशी मागणी केली होती.

आता कदमांनी “मी तयार आहे नार्को टेस्टसाठी, पण कोर्टात उत्तर देईन” असं स्पष्ट सांगत परबांविरुद्ध कायदेशीर लढाईचा इशारा दिला आहे.

____