Former corporator encroached on government premises : माफसूची जागा हडपून व्यावसायिक वापर केला
Nagpur महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची (माफसू) तेलंगखेडी येथील जागा हडपून त्यावर अवैध बांधकाम करून लॉन टाकत त्याचा व्यावसायिक वापर केल्याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी माजी नगरसेवक कमलेश चौधरी, त्यांच्या आई माजी नगरसेविका मीना चौधरी व भाऊ मुकेश चौधरी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण मागील अनेक महिन्यांपासून तापले होते.
माफसूची तेलंगखेडी येथील खसरा क्रमांक २० ची जागा हडपल्याबाबत माफसूचे कनिष्ठ अभियंता प्रमोदकुमार विश्वासराव तायडे (वय ५३, रा. वेलकम सोसायटी, गिट्टीखदान) यांनी गिट्टीखदान पोलिस ठाण्यात तक्रार दिली. कमलेश चौधरी यांनी माफसूच्या तेलंगखेडी येथील जागेवर अवैध बांधकाम करून लॉन उभारले.
त्या लॉनचा त्यांनी व्यावसायिक वापर सुरू केला. त्यामुळे कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांनी याबाबत महापालिका आयुक्त व पोलिस आयुक्तांना पत्र दिले होते. या प्रकरणी अन्याय निवारण मंचच्या अध्यक्ष ज्वाला धोटे यांनीही माफसूकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयात बैठक घेऊन सर्व यंत्रणांना अतिक्रमण काढण्याचे निर्देश दिले होते.
Crime in Wardha : अट्टल घरफोडे सापडले, १५.८८ लाखांचा मुद्देमाल जप्त
या जागेचा सातबाराही माफसूच्या नावाने आहे. या सर्व घटनांमध्ये माफसूचे कनिष्ठ अभियंता प्रमोदकुमार तायडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी कमलेश चौधरी, मीना चौधरी व मुकेश चौधरी यांच्या विरुद्ध कलम ३२९ (३), ३ (५), महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ५२ आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ च्या कलम १६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास गिट्टीखदान पोलिस करीत आहेत. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.