Breaking

Kashmir terrorist attack : केवळ माफी मागून होणार नाही !

 

Chandrashekhar Bawankule said that Vijay Vadettiwar’s apology is not Enough : वडेट्टीवारांच्या बोलण्यामुळे काँग्रेस पक्षाचा खरा चेहरा समोर आला

Nagpur : जम्मू – काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याबाबत काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी काल (२८ एप्रिल) एक विधान करून वाद ओढवून घेतला होता. त्यानंतर आज (२९ एप्रिल) त्यांनी यासंदर्भात माफीदेखील मागितली. पण राज्याचे ऊर्जामंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वडेट्टीवारांच्या त्या वक्तव्याचा समाचार घेतला.

पर्यटकांवर हल्ला करताना दहशतवाद्यांना लोकांचा धर्म विचारण्याचा वेळ मिळाला का? दहशतवादी धर्माची चौकशी करत बसतात का? दहशतवाद्यांनी पहिल्यांदा धर्म विचारून गोळीबार केला, असे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केले होते. त्यावरून त्यांच्याविरोधात टिकेची झोड उठवण्यात आली. महसूल मंत्री बावनकुळे यासंदर्भात बोलताना म्हणाले की, विजय वडेट्टीवार यांनी असंवेदनशील आणि देशातील जनतेच्या भावना दुखावणारे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

Vijay Wadettiwar : अरे..! येथेही स्वतःचे मार्केटींग करताय का ? वडेट्टीवार संतापले..

वडेट्टीवार जे बोलले, त्यानंतर केवळ माफी मागून होणार नाही. केवळ आणि केवळ मीडियामध्ये चर्चेत राहण्यासाठी बोलायचं. पण आपल्या बोलण्याचा समाजावर काय परिणाम होईल, याचा काहीही विचार करायचा नाही, हे योग्य नाही. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात ज्या लोकांचे परिवार उद्धवस्त झाले, त्यांच्या मनाला काय वेदना होतील, याचाही विचार वडेट्टीवार यांनी केला नाही.

Chandrashekhar Bawankule : शासनावरील विश्वास वाढवण्याचा प्रयत्न

एखादा व्यक्ती कितीही मोठ्या पदावर असला तरी असंवेदनशील वक्तव्य करू नये. वडेट्टीवारांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस पक्षाचा खरा चेहरा समोर आला आहे. देशाबद्दलच्या त्यांच्या भावना यातून दिसून पडल्या. पुढील काळात जनता यांना सोलून काढल्याशिवाय राहणार नाही, असेही महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले.