Does Vijay Vadettiwar have common sense? Shiv Sena is angry : विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन
Mumbai : जम्मू – काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांच्या आणि जखमींच्या अनुभवांवर शंका घेणारे काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात शिवसेनेने मुंबईतील बाळासाहेब भवन येथे आंदोलन केले. दहशतवाद्यांची पाठराखण करणाऱ्या वडेट्टीवारांचा यावेळी तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला.
शिवसेनेच्या नेत्या डॉ. मनीषा कायंदे आणि शायना एन. सी. यांच्या नेतृत्वात महिला कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. यावेळी डॉ. कायंदे म्हणाल्या, विजय वडेट्टीवार यांनी अत्यंत निर्लज्जपणाचे वक्तव्य केले. हल्ल्यात मरण पावलेल्या कुटुंबीयांच्या जखमेवर त्यांनी मीठ चोळले आहे. हल्ल्यातून बचावलेल्या पर्टटकांबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या वडेट्टीवारांचं डोकं ठीकाणावर आहे का, असा सवालही त्यांनी केला.
Clean, beautiful city : स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षीत शहर हीच खरी सेवा !
विजय वडेट्टीवारांच्या विरोधात डॉ. कायंदे यांनी मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. वडेट्टीवरांच्या पूर्वी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी दहशतवाद्यांची पाठराखण करणारी विधाने केली असल्याचा आरोपही डॉ. कायंदे यांनी केला. रॉबर्ट वड्रा, तारिख हमीद करा, सैफुद्दीन सोज, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या, मंत्री आर.बी थिम्मापूर यांनी पर्यटकांच्या कुटुंबीयांचा अपमान केल्याचेही डॉ. कायंदे यांनी म्हटले आहे.
MP Prashant Padole : खासदारांच्या दरबारात जनतेने प्रशासनाला घेतले धारेवर!
पाकधार्जीन्या काँग्रेस नेत्यांचा आम्ही निषेध करतो, असे डॉ. कायंदे म्हणाल्या. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीनगरमध्ये जाऊन पर्यटकांना धीर दिला. त्यांना महाराष्ट्रात सुखरुप परत आणले. तर काँग्रेस नेत्यांनी पर्यटकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले, असेही त्या म्हणाल्या.