Breaking

Kashmir terrorist attack : पाकिस्तानी नागरिकांसोबत काँग्रेस नेत्यांना पाठवा !

 

Sanjay Nirupam’s scathing criticism of Congress leaders : त्यांनी नाव बदलून पाकिस्तानी नॅशनल काॅंग्रेस करावे

Mumbai : मुस्लीम मते मिळवण्यासाठी काँग्रेस नेते इतक्या खालच्या स्तरावर आले की ते आता खुलेआम भारताच्या विरोधात भूमिका घेत आहेत. पहलगाम येथील दहशतवाद्यांच्या हल्ल्यातून वाचलेल्या लोकांवर ते आता संशय घ्यायला लागले आहेत आणि बेताल वक्तव्य करू लागले आहेत. त्यामुळे काँग्रेस नेत्यांचा देशभक्तीचा बुरखा फाटला, अशी टीका शिवसेनेचे उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम य़ांनी केली.

आज (२९ एप्रिल) मुंबईत पत्रकार परिषदेत निरुपम बोलत होते. ते म्हणाले, सध्या भारतातील पाकिस्तांनी नागरिकांना हुडकून काढून पाकिस्तानात परत पाठवण्याचे काम सुरू आहे. या लोकांसोबत काँग्रेस नेत्यांनाही पाकिस्तानला पाठवून द्या आणि त्यांनी त्यांच्या पक्षाचे नाव इंडियन नॅशनल काँग्रेस बदलवून पाकिस्तान नॅशनल काँग्रेस करावे, असा सल्लाही निरुपम यांनी दिला.

Sanjay Nirupam : बाळासाहेबांचे भाषण ‘एआय’चा वापर करून दाखवणे म्हणजे उबाठा लयास जाणे !

 

त्या हल्ल्यानंतर भारतीयांचे मन पेटून उठले आहे. बदला घेण्याची भावना भारतीयांच्या मनात आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस नेते बेताल वक्तव्य करून भारतीयांच्या भावनांशी खेळत आहेत. रॉबर्ट वड्रा, तारिख हमीद, सैफुद्दीन सोज, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या, मंत्री आर.बी थिम्मापूर यांनी पर्यटकांच्या कुटुंबीयांचा अपमान केल्याचे निरुपम म्हणाले.

Sanjay Nirupam : आदित्य ठाकरे लवकरच बनतील हत्यादी ठाकरे !

केंद्र सरकारने बोलावलेल्या बैठकीत काँग्रेस नेत्यांनी पाकिस्तानच्या विरोधात सरकारला पाठींबा दर्शवला होता. पण वेगवेगळ्या राज्यांतील काँग्रेसचे नेते दहशतवादी हल्ल्यावरून राजकारण करत आहेत. दहशतवाद्यांची बाजू घेणारी वक्तव्ये काँग्रेस नेते करत आहेत. पर्यटकांचे ओळखपत्र पाहून, धर्म विचारून गोळीबार केला, भारतात मुस्लीमांना नमाज पठण करून दिले जात नाही. रस्त्यांवरील गर्दीमुळे नमाज पठण करण्यास मज्जाव केला जातो. त्यामुळेच दहशतवादी हल्ला झाला, असा जावईशोध काँग्रेसचे जावई रॉबर्ट वड्रा यांनी लावला. आता यांनाच पाकिस्तानात पाठवण्याची वेळ आली असल्याचेही संजय निरुपम म्हणाले.