Breaking

Kashmir terrorist attack : चॅनल्सना विनंती आहे की, माझं पूर्ण वक्तव्य दाखवा !

 

Vijay Vadettiwar’s reaction after criticism : टिकेची झोड उठल्यानंतर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया

Nagpur : दहशतवादी हल्ला करताना लोकांशी बोलतात का? त्यांच्या धर्माची चौकशी करत बसतात का? असे वक्तव्य काँग्रेस विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी काल (२८ एप्रिल) केले. त्यावरून त्यांच्याविरोधात टिेकेची झोड उठवली जात आहे. यासंदर्भात वडेट्टीवार म्हणाले की, माझं वक्तव्य मोडतोड करून दाखवण्यात आलं. चॅनल्सना माझी विनंती आहे की, माझं पूर्ण वक्तव्य जसंच्या तसं दाखवण्यात यावं.

विजय वडेट्टीवार यांनी आज (२९ एप्रिल) नागपूर विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले. दहशतवाद्यांनी पहिल्यांदा धर्म विचारून गोळीबार केला. पाकिस्तानने भारताला आपापसांत लढवण्याचे षडयंत्र रचले आहे आणि सरकार आपलं अपयश लपवण्यासाठी माझं वक्तव्य मोडतोड करून दाखवत आहे. देशात कटकारस्थान रचण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

Bravery awards and jobs : हल्ल्यात ठार झालेल्यांच्या कुटुंबीयांना शौर्य पुरस्कार व नोकरी द्या !

दहशतवाद्यांना पाकिस्तानने शिकवून पाठवलं होतं. देशात यादवी व्हावी म्हणून धर्म विचारून गोळीबार करण्यात आला. देशाच्या सार्वभौंमत्वाला, अखंडतेला त्यांना खिंडार पाडायचं होतं. म्हणून त्यांनी असा कट रचला. अतिरेक्यांना कुठला धर्म नसतो, असं मी बोललो होतो. कारण भारताला कमजोर करण्यासाठी हा हल्ला होता. २६ वर्षांनंतर पर्यंटकांवर झालेला हा हल्ला आहे. हे सरकारचे अपयश आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

Kashmir terrorist attack : आज सायंकाळपर्यंत एकूण एक पाकिस्तानी परत जाणार !

ज्या निष्पाप लोकांचा या हल्ल्ल्यात बळी गेला, त्यांच्या कुटुबीयांची मने माझ्या बोलण्यामुळे दुखावली गेली असतील, त्यांना वेदना झाल्या असतील तर मी माफी मागतो. पण मीडियाला माझी विनंती आहे की, माझे वक्तव्य पूर्ण दाखवा, अर्धवट दाखवून सरकारचे अपयश लपवू नका, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.