Breaking

Kashmir terrorist attack : आज सायंकाळपर्यंत एकूण एक पाकिस्तानी परत जाणार !

Devendra Fadnavis said that each and every Pakistani will return by this evening : यासंदर्भात जबाबदारीने वृत्तांकन करावे

Nagpur : जम्मू – काश्मीर येथील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर केंद्र सरकारने त्यावर गंभीरतेने कारवाई केली. देशात वास्तव्यास असलेल्या प्रत्येक पाकिस्तानी नागरीकास परत जाण्याचे आदेश देण्यात आले. सर्वच राज्यांत त्यावर अंमल करण्यात येत आहे. महाराष्ट्रातही पाकिस्तानी नागरिकांना हुडकून काढून परत पाठवण्याची कारवाई युद्धपातळीवर सुरू आहे. अशात महाराष्ट्रातून काही पाकिस्तानी बेपत्ता झाल्याचे वृत्त काही ठिकाणी प्रकाशीत झाले. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तडक उत्तर दिले आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रातील एकही पाकिस्तानी नागरीक बेपत्ता नाही. सर्वांना परत पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आज सायंकाळपर्यंत एकूण एक पाकिस्तानी नागरीकाला त्यांच्या देशात परत पाठवण्यात येईल. यासंदर्भात जबाबदारीने वृत्तांकन करावे, असे आवाहनही प्रसारमाध्यमांना त्यांनी केले. राज्यात पाच हजारांहून अधिक पाकिस्तानी नागरिक आहेत. यांपैकी शंभराहून अधिक पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असल्याचे वृत्त आले. त्या वृत्ताचे मुख्यमंत्र्यांनी खंडण केले आहे.

Navneet Rana : नवनीत राणा म्हणाल्या, ‘एकवेळ बंदुकीची गोळी खाईन, पण…’

पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्याची कार्यवाही युद्धपातळीवर करण्यात आली. पण विरोधी पक्षातील काहींनी यावरही टीका केल्या. राजकारण करण्याचा प्रयत्न केला. त्यांना सत्ताधाऱ्यांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले. आता केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरीकांना परत पाठवण्याचे आदेश दिल्यानंतर ही कारवाईसुद्धा युद्धपातळीवर सुरू आहे. याद्या तयार झाल्या असून एक – एक पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवले जात आहे.

Ravindra Chavhan : रवींद्र चव्हाण म्हणाले, ‘लक्षात ठेवा, आपल्याला पक्षानं मोठं केलय’

यासंदर्भात काही उलटसूलट वृत्त पसरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण आता यामध्ये तरी कुणी राजकारण करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.