Katol blast : आणखी तीन महिलांनी घेतला अखेरचा श्वास, स्फोटाच्या वेदनांमध्ये होरपळताहेत कुटुंब

Three-more-women-died-katol-blast-case : राऊळगाव स्फोटातील मृत कामगारांची संख्या पोहचली २३ वर

Nagpur काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील बारुद तयार करणाऱ्या कंपनीत झालेल्या स्फोटात एकूण १९ जणांचा मृत्यू झाला होता आणि १७ कामगार गंभीर जखमी झाले होते. जखमींपैकी मागील दोन दिवसात आणखी चार कामगार दगावले आहेत. रविवारी दोन तर सोमवारी आणखी महिला कामगाराचा मृत्यू झाला असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आता या स्फोटात मृत पावलेल्यांची संख्या २३ झाली आहे.

मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी या स्फोटाची गंभीर दखल घेऊन स्फोटकाशी संबंधित २१ जणांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते.

Rajya sabha election : सातही उमेदवारांची निवड निश्चित, राज्यसभा निवडणूक बिनविरोध!

त्यानुसार कंपनीचा मालक, संचालक व्यवस्थापकासह ११ लोकांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. यात एसएलबी कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टरचा समावेश आहे. मोठ्या प्रमाणात जीवहानी झाली असल्याने हे प्रकरण सरकार हलक्यात घेणार नाही. जे कोणी दोषी असतील त्या सर्वांना निश्चित कारवाई केली जाईल असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला होता.

सोबतच जखमींवर उपचार सुरू असलेल्या ऑरेंज सिटी इस्पितळाच्या व्यवस्थापनाला सर्वोत्तम उपचार देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. जखमी झालेले कामगार जवळपास ८० टक्के भाजल्या गेले आहेत. त्यांना इन्फेक्शन होण्याचा धोका असल्याने अधिक दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मृतांच्या कुटुंबीयांना ७५ लाख रुपयांचे नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. यापैकी पाच लाख मुख्यमंत्री फंडातून, दोन लाख रुपये पीएम फंडातून दिले जाणार आहे. उर्वरित रक्कम कंपनीकडून दिली जाणार आहे. जखमींना २५ लाख रुपये कंपनीच्यावतीने देण्यात आले आहेत. दरम्यान विधानसभेतही या स्फोटावर चर्चा झाली.

Gram Panchayat Elections : ‘गुगल अर्थ’वर गावे अजूनही पाण्याखाली; प्रभागरचनेत तांत्रिक अडथळा

कामगार मंत्री आकाश फुंडकर आणि कामगार राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी या स्फोटाला जो कोणी जबाबदार असले त्याला सोडणार नाही असे आश्वासन दिले आहे. सोबतच कायद्यात दुरुस्ती करण्याचा आणि अति ज्वलनशील क्षेत्रात ऑटोमेशन करून ही कामे मानवरहित करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवणार असल्याचे सांगण्यात आले आहे.