Three members of the Jaiswal family from Wani, Yavtamal district, died : आजोबांकडे असल्याने मुलगा विवान बचावला
Nagpur : केदारनाथ येथे दर्शन करून परत येत असताना हेलिकॉप्टरचा अपघात झाला. हा अपघात आज (ता. १५ जून) सकाळी झाला. हे हेलिकॉप्टर केदारनाथ वरून सात प्रवाशांना घेऊन गुप्तकाशी येथे जात होते. दरम्यान गौरीकुंडजवळ हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले. या अपघातात पायलटसह सात जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथील जयस्वाल कुटुंबातील तिघांचा समावेश आहे.
Bhaskar Jadhav : निवडणूक लढा, पण पक्षाकडून खर्च मिळणार नाही!
राजकुमार जयस्वाल, श्रद्धा जयस्वाल आणि या दाम्पत्याची २३ महिनांची मुलगी काशी जयस्वाल यांचा मृत्यू झाल्याची माहीती समोर आली आहे. एक वर्षापूर्वी राजकुमार यांनी काशीच्या नावाने वणीत काशी शिवपुराण महाकथेचे आयोजन केले होते, हे विशेष. जयस्वाल परिवारासोबत त्यांचा मुलगा विवानसुद्धा केदारनाथला जाणार होता. पण ऐनवेळी तो पांढरकवडा येथे आजोबांकडे राहिला. त्यामुळे तो या अपघातातून तो बचावला. या घटनेमुळे वणी येथे शोककळा पसरली आहे.
केदारनाथ येथे जयस्वाल कुटुंबीयांचे दर्शन काल (ता. १४ जून) झाले होते. आज पहाटे ते परिसर फिरण्यासाठी गेले होते. दरम्यान पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृतदेहांची ओळख अद्याप पटली नसल्याची माहिती वणीतून मिळत आहे. मृतांमध्ये एकूण सात जणांचा समावेश आहे. त्यामध्ये श्रद्धा जयस्वाल आणि काशी जयस्वाल या दोनच महिला होत्या. त्यामुळे यांची ओळख सहज पटू शकेल. पण पाच पुरूषांची ओळख पटणे अवघड असल्याचे सांगितले जात आहे.
Maharashtra’s Farmers : अदानीसाठी नियम बदलता, मग शेतकऱ्यांसाठी नियम व अटी कशाला ?
मागील वर्षी राजकुमार जयस्वाल यांनी मुलगी काशी जयस्वाल हिच्या नावाने वणीमध्ये शिवपुराण महाकथा पर्वाचे आयोजन केले होते. यावेळी पंडीत प्रदीप मिश्रा यांनी महाकथा सादर केली होती. श्रद्धा या पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या मानसकन्या असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतदेह लवकरात लवकर वणीत आणले जावे, यासाठी पंडीत प्रदीप मिश्रा यांच्यासह एका ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी उत्तराखंड सरकारला फोन केल्याची माहिती ‘सत्तावेध’ला जयस्वाल कुटुंबियांच्या निकतवर्तीयांनी दिली.