Khadakpurna Dam : खडकपूर्णा प्रकल्पाचे पुन्हा सर्वच १९ दरवाजे उघडले!

Overflows due to heavy rainfall : ५० सेमीने पाण्याचा विसर्ग, जोरदार पावसामुळे प्रकल्प ओव्हर फ्लो

Buldhana बुलढाणा जिल्ह्यासह मराठवाड्यात जोरदार पाऊस होत आहे.त्यामुळे धरणाच्या जलसाठ्यात वाढ होत आहे.खडकपूर्णा प्रकल्प १०० टक्के भरला असून सर्वच १९ गेट ५० सेमीने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे, खडकपूर्णा नदीच्या काठावर असलेल्या ३३ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यात दुसऱ्यांदा खडकपूर्णा पर्कल्पाचे सर्वच गेट उघडण्यात आले आहेत.

जिल्ह्यात सिंचनासह पाणीपुरवठा याेजनेसाठी महत्वाचे असलेल्या संत चाेखासागर प्रकल्पाच्या क्षेत्रात जाेरदार पाउस झाला आहे. त्यामुळे, प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या प्रकल्प १०० टक्के भरला आहे.या प्रकल्पाचा प्रकल्पीय संचयीत साठा ९३.४० दलघमी आहे व पूर्ण संचय पातळी ५२०.५० मीटर आहे. प्रकल्पात सद्यस्थितीत ५२९ मीटर जलाशय पातळी आहे. प्रकल्पाचे पाणी प्रकल्प शेजारील गावात शिरू शकते, त्यामुळे २३ सप्टेंबर रोजी सर्व म्हणजे १९ दरवाजे ५० सेंटीमीटरने उघडण्यात आले असून नदीपात्रात पाणी सोडले आहे.त्यामुळे खडकपूर्ण नदीला पूर आहे. सध्या नदीपात्रात १३२६ घन सेमी, ४६ हजार ८५४ घन फूट सेमी पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. प्रकल्पाच्या क्षेत्रात आणखी पाउस झाल्यास प्रकल्पातून विसर्ग वाढवण्यात येणार आहे.

Match Controversy : पाकड्यांनी भारतीय पर्यटकांना असं मारलं हेच त्याच्या कृतीतून…,

या गावांना दिला सतर्कतेचा इशारा
नदीकाठावरील गावापैकी देऊळगाव राजा तालुक्यातील निमगाव गुरू, सावंगी टेकाळे, डिग्रस बुद्रुक, डिग्रस खुर्द, टाकरखेड वायाळ, टाकरखेड भागिले, सिंदखेड राजा तालुक्यातील निमगाव वायाळ, साठेगाव, हिवरखेड, राहेरी खुर्द, तडेगाव, राहेरी बुद्रुक, ताडशिवणी, देवखेड, पिंपळगाव कुंडा, लिंगा आणि लोणार तालुक्यातील खापरखेडा, रायगाव व सावरगाव तेली गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.