Khamgao APMC : खामगाव बाजार समिती सभापतींच्या विरोधातातील अविश्वास प्रस्तावावर आज चर्चा!

Discussion on No-Confidence Motion Against the Chairperson Today : सभेच्या पार्श्वभूमीवर खामगाव शहरात जमावबंदी; १८ पैकी १३ सदस्यांनी व्यक्त केला विरोध

Khamgao स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष पेसोडे यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर आज, शुक्रवार, दि. १४ नोव्हेंबरला चर्चा होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून खामगाव शहरात जमावबंदी आदेश जारी केला आहे.

विशेष सभा बाजार समितीच्या स्व. विलासराव देशमुख सभागृहात (टी.एम.सी. यार्ड परिसरात) घेण्यात येणार असून, ही सभा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत नियोजित करण्यात आली आहे.

Local Body Elections : सिंदखेडराजात तिरंगी लढत, युती-आघाडी आजमावणार नशीब!

खामगाव शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, २ नोव्हेंबर २०२५ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळातील १८ पैकी १३ सदस्यांनी विद्यमान सभापती सुभाष पेसोडे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी १४ नोव्हेंबर रोजी विशेष सभा बोलावण्यात आली असून, या बैठकीदरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

परिस्थितीचा विचार करून उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते रात्री १० या कालावधीत सभास्थळी जमावबंदी आदेश लागू केल्याची माहिती दिली आहे. या आदेशानुसार, निर्दिष्ट परिसरात कोणत्याही व्यक्तीला किंवा गटाला एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. कोणतीही घोषणा, निदर्शने किंवा शांतता भंग करणारे कृत्य करण्यास बंदी आहे. तसेच, अनधिकृत व्यक्ती आणि वाहनांना प्रवेशबंदी घालण्यात आली असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलिस विभागाने स्पष्ट केले आहे.

Local Body Election : नागपूर जिल्ह्यातील हॉट नगर परिषदेमध्ये पुन्हा दोन दिग्गज आमने-सामने !

या घडामोडींमुळे खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे. सभापतीपदावरून पेसोडेंना हटविण्याच्या चळवळीमुळे संचालक मंडळात गटबाजी उफाळून आली असून, १४ नोव्हेंबरची सभा निर्णायक ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.