Congress facing internal conflicts in Buldhana : बुलढाण्यात दुहेरी आव्हान, उघड मतभेदांमुळे बैठकांवर परिणाम
Khamgao खामगाव येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागातर्फे आयोजित ओबीसी कार्यकर्ता शिबिराकडे बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेस संघटन बळकट करण्याच्या महत्त्वाच्या राजकीय हालचाली म्हणून पाहिले जात आहे. आगामी स्थानिक आणि विधानसभा राजकारणाच्या पार्श्वभूमीवर नव्या कार्यकर्त्यांची फळी उभी करणे आणि ओबीसी समाजात पक्षाचा प्रभाव वाढवणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश मानला जात आहे.
मात्र, या सकारात्मक प्रयत्नांसोबतच काँग्रेससमोर पक्षांतर्गत नाराजी आणि गटबाजीचे दुहेरी आव्हान आहे. स्थानिक पातळीवर काही पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेली अंतर्गत कुरबुर अद्यापही कायम असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, अलीकडील बैठकीत काही मतभेद उघडपणे समोर आल्याने स्थानिक नेतृत्वातील दरी अधिकच स्पष्ट झाल्याचे बोलले जात आहे.
शिबिराच्या माध्यमातून नव्या कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न निश्चितच महत्त्वाचा आहे; मात्र नाराज गटाची समजूत न काढल्यास संघटन विस्ताराचा अपेक्षित परिणाम मर्यादित राहू शकतो. त्यामुळे या शिबिरातून मिळणाऱ्या उर्जेसोबत स्थानिक मतभेद मिटवून एकसंघ नेतृत्व उभे करणे हीच काँग्रेसपुढील खरी कसोटी ठरणार आहे.
Water shortage : जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट; प्रकल्पांतील साठा ३४ टक्क्यांवर
जिल्ह्यात आगामी निवडणुकांची चाहूल लागलेली असताना, ओबीसी मतदारांमध्ये पक्षाची पकड मजबूत करणे काँग्रेससाठी रणनीतीचा भाग मानला जात आहे. परंतु दुसरीकडे गटबाजीमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्यास त्याचा थेट परिणाम पक्षाच्या निवडणूक तयारीवर होऊ शकतो.
Congress srujan campaign : ‘गाव तिथे काँग्रेस, वार्ड तिथे काँग्रेस’; काँग्रेसला ‘मिरॅकल’ची आशा!
यामुळे कार्यक्रमांच्या माध्यमातून केवळ संघटन वाढवण्यापेक्षा स्थानिक स्तरावरील नाराजी, नेतृत्वातील समन्वयाचा अभाव आणि पदाधिकाऱ्यांतील दुरावा दूर करणे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे खामगावातील हे शिबिर काँग्रेससाठी संघटन बळकटीसोबत अंतर्गत ऐक्य सिद्ध करण्याचीही संधी मानली जात आहे.








