Breaking

Kirit Somaiya : बनावट दाखल्यांच्या प्रकरणात मोठी कारवाई !

Big action in the case of fake documents : २.२३ लाख दाखल्यांची पुनर्तपासणी होणार

Akola बनावट दाखल्यांच्या आधारे भारतीय नागरिकत्व मिळविण्याच्या प्रकरणी अकोला येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तीन दिवसांत आणखी १० ठिकाणी गुन्हे दाखल होणार असून, जिल्ह्यातील २८७ जणांची नावे एफआयआरमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. या सर्वांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजप नेते माजी खासदार किरिट सोमया यांनी अकोला येथे माध्यमांशी बोलताना दिली. राज्यात 2.23 लाख दाखल्यांची पुन्हा तपासणी होणार असल्याचेही ते म्हणाले.

मालेगावमध्ये बनावट दाखले मिळवून देणाऱ्या एजंट आणि वकिलावर कठोर कारवाई करत न्यायालयाने त्यांना कारागृहात पाठविले आहे. अकोला आणि अमरावती जिल्हा प्रशासनाने या संदर्भात फॉरेन्सिक ऑडिट करण्याची शिफारस केली आहे.

Dr. Pankaj Bhoyar : उद्धव ठाकरेंवर जनतेचा विश्वास राहिला नाही

महाराष्ट्रात आतापर्यंत २ लाख २३ हजार लोकांना बनावट दाखल्यांच्या आधारे भारतीय नागरिकत्व मिळाल्याचे उघड झाले असून, आता या सर्वांची चौकशी होणार आहे. भाजप नेते किरिट सोमय्या यांनी अकोला येथे माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत असून, सर्व २.२३ लाख दाखल्यांची पुनर्तपासणी केली जाणार आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे नागरिकत्व मिळवणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई केली जाईल, असेही सोमय्या यांनी स्पष्ट केले.

हा घोटाळा उघड झाल्यानंतर प्रशासन अधिक सतर्क झाले असून, भविष्यात अशा प्रकारच्या बनावट कागदपत्रांच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत. फॉरेन्सिक ऑडिट आणि चौकशीच्या अहवालानंतर या प्रकरणात आणखी धक्कादायक तथ्ये समोर येण्याची शक्यता आहे, असे सोमय्या म्हणाले.

VNSS mission : शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज, अवैध सावकारीला आळा!

अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातही बनावट दाखले मिळविल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यासाठी सोमय्या यांनी मंगळवारी पातूर पोलिस स्टेशनला भेट देऊन माहिती घेतली. त्यांच्यासोबत आमदार रणधीर सावरकर, भाजपचे अकोला जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

अमरावतीत सहा जणांविरुद्ध गुन्हे
तहसील कार्यालयात जन्म व मृत्यू दाखल्यांसाठी खोटी कागदपत्रे सादर केल्याने सहा नागरिकांविरुद्ध येथील गाडगेनगर ठाण्यात सोमवारी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत अमरावती तहसीलच्या नायब तहसीलदार टीना चव्हाण यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आरिफू रहेमत खान आगा अजीज रहेमान खान, मोहम्मद निजामुद्दीन मोहम्मद हनीफ मुल्ला, जमील खान कासम खान, सायरा परवीन अब्दुल वाहब (सर्व रा. अमरावती) व रहित खान न्यामत खान व सय्यद युसूफ अली सय्यद कादर (दोन्ही रा. बडनेरा) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) ३३६(३) व ३४० (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.