Kirit Somaiya demands for the scrutiny of application : जन्म प्रमाणपत्रातील मोठ्या घोटाळ्याचा दावा; जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा
Akola : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बांगलादेशी रोहिंग्यांना मोठ्या प्रमाणात बोगस जन्म प्रमाणपत्रे देण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे. शुक्रवारी (२४ जानेवारी) माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, अकोला जिल्ह्यात १५,८४५ बांगलादेशी रोहिंग्यांना बोगस प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. राज्यात २०२४ मध्ये दोन लाखांपेक्षा अधिक नागरिकांना बनावट जन्म प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे सर्वाधिक प्रमाणपत्रे वाटप झाली आहेत. त्यानंतर अकोला दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे सोमय्या यांनी नमूद केले.
सोमय्या म्हणाले की, अकोला जिल्हा बोगस प्रमाणपत्र वाटपाचे केंद्र बनत आहे. अमरावती व अंजनगाव या ठिकाणीही बनावट जन्म प्रमाणपत्रांच्या वाटपाचा प्रकार सुरु असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील सर्व अर्जांची छाननी होणे आवश्यक आहे, अशी मागणी त्यांनी केली.
Zilla Parishad school : मानधन मिळेपर्यंत शिक्षक रजेवर, विद्यार्थी वाऱ्यावर !
प्रमाणपत्रांची चौकशी सुरू होणार
महापालिका प्रशासनाकडे २०२१ ते २०२३ या कालावधीत १६,००० अर्ज प्राप्त झाले होते, तर २०२४ मध्ये अडीच हजार अर्ज दाखल झाल्याची माहिती सोमय्या यांनी दिली. गेल्या वर्षभरात १० लाख रोहिंग्यांना बनावट जन्म प्रमाणपत्रे वाटप करून भारतीय नागरिकत्व दिल्याचे षडयंत्र उघडकीस आले आहे.
Gondia Zilla Parishad : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष प्रथमच बिनविरोध !
महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
महाविकास आघाडी सरकारने व्होट बँकेसाठी देशाच्या सुरक्षेशी तडजोड केल्याचा आरोप करत, किरीट सोमय्या यांनी या प्रकरणात राजकीय भ्रष्टाचाराचा आरोप केला. त्यांनी सांगितले की, याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यावेळी भाजप आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील, माजी नगरसेवक प्रशांत अवचार आदी उपस्थित होते.