Breaking

Kisan Congress : शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले तर याद राखा, किसान काँग्रेसचा सरकारला इशारा

Don’t ignore farmers’ demands, delegation meets Tehsildar : शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन

Sangrampur निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची अद्याप पूर्तता न झाल्याने भारतीय राष्ट्रीय किसान काँग्रेसने सरकारविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसह राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तहसीलदारांमार्फत निवेदन सादर करण्यात आले.

निवडणूक प्रचारात जाहीर केलेली शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तात्काळ पूर्ण करावी. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना कापूस उत्पादकांप्रमाणे आर्थिक मदत व कर्जमाफी देण्यात यावी. २०२२ मधील अतिवृष्टीचे अनुदान अद्यापही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही, ते तातडीने द्यावे. २०२४ च्या खरीप-रब्बी हंगामातील मंजूर पिकविमा अद्याप वितरित करण्यात आलेला नाही. अकोला व बुलढाणा जिल्ह्यात पिक विमा प्रीमियममध्ये असलेली तफावत दूर करावी.

Bacchu kadu meets Raj Thackarey : राज ठाकरे दिसणार कर्जमाफी यात्रेत? बच्चू कडूंचे निमंत्रण

रोजगार हमी योजनेंतर्गत केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मस्टर अद्याप निघालेले नाहीत, त्याकडे तातडीने लक्ष द्यावे. सोयाबीन पिकांवर आलेला अमरवेल व हुमणी अळीचा प्रादुर्भाव लक्षात घेता, तातडीने नुकसानभरपाई किंवा मदत जाहीर करावी, या मागण्या निवेदनात मांडल्या आहेत.

Chandrashekhar Bawankule : राज्यातील शेत पाणंद रस्ते विकासासाठी मास्टर प्लान!

या सगळ्या मागण्यांकडे सरकारने तातडीने लक्ष न दिल्यास जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा भारतीय राष्ट्रीय किसान काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. संतोष राजनकर, राजेंद्र वानखडे, बाळासाहेब डोसे, अभयसिंह मारोडे, किसान काँग्रेस तालुकाध्यक्ष गणेश मानखैर, अविनाश झाडोकार, हरिदास ताथोड, प्रकाश साबे, योगेश बाजोड, नारायण बोरवार, संजय अवचार, अरुण निंबोळकार, गणेश खिरोळकर, प्रशांत गावंडे, गजानन भारसाकडे, अरविंद गिरे, अविनाश पुंडे, आकाश बोरसे, वामन बोरसे, राजेश गव्हाडे, बाबुराव लटके आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.यावेळी मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.