After expulsion from Shiv Sena, Kishore Tiwari criticizes Raut, Narvekar : शिवसेनेतून हकालपट्टीनंतर किशोर तिवारी यांचा हल्लाबोल
Nagpur- गेल्या काही वर्षांपासून उद्धव सेनेची माध्यमांमध्ये जोरदारपणे बाजू मांडणारे किशोर तिवारी (Kishor Tiwari) यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. Kishore Tiwari has been expelled from the party. यामागे संजय राऊत कंपनीचे कारस्थान असल्याचा पलटवार किशोर तिवारी यांनी केला आहे. जनाधार नसलेल्या नेत्यांची तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी तिवारी यांनी केली होती. त्यांचा रोख खासदार संजय राऊत यांच्या कडे होता. यामुळे त्यांची हकालपट्टी झाल्याचे बोलले जात आहे. त्याचवेळी खासदार संजय राऊत व आमदार मिलिंद नार्वेकर यांनी ‘मातोश्री’चा पूर्णपणे ताबा घेतल्याचा आरोप करून उद्धव सेनेसमोर पुन्हा अडचणी उभ्या केल्या आहेत.
विधानसभा निवडणुका झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला जोरदार गळती लागली आहे. या स्थितीतही विदर्भातील नेते व शेतकरी स्वावलंबी मिशनचे माजी अध्यक्ष किशोर तिवारी माध्यमांमध्ये शिवसेनेची जोरदारपणे बाजू मांडत होते. कोकणातून एकएक नेता उद्धव सेनेची साथ सोडून जात आहे. विदर्भात शिवसेनेचे असलेले ताकदीचे नेते आधीच शिंदे सेनेत सामील झाले आहेत. यात संजय राठोड, भावना गवळी, आशीष जयस्वाल, कृपाल तुमाने, प्रताप जाधव, या मतब्बरांचा समावेश आहे.
Delhi Marathi Sahitya Sammelan : मराठी शाळा जगल्या पाहिजे, मुलं मराठीत बोलली पाहिजे
परंतु दुसऱ्या फळीतील नेते अद्यापही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन होते. परंतु आता या फळीतील नेतृत्वाला सुद्धा गळती लागल्याचे किशोर तिवारी यांच्या गच्छंतीने स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वी किशोर तिवारी यांनी थेट मातोश्रीवर हल्लाबोल केला होता. मातोश्रीवर खासदार संजय राऊत व आमदार मिलिंद नार्वेकर यांचा ताबा असल्याचे विधान किशोर तिवारी यांनी केले होते.
यानंतर यावर मातोश्रीवरून कारवाई होईल, असे म्हटले जात होते. यानुसार बुधवारी रात्री तिवारी यांची प्रवक्तापदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. हिंदी व इंग्रजीवर असलेल्या प्रभूत्वामुळे किशोर तिवारी राष्ट्रीय पातळीवरील न्यूज चॅनेलवर पक्षाची भूमिका दमदारपणे मांडत होते. गेल्या पाच वर्षांपासून शिवसेनेत असलेल्या तिवारी यांना कोणतेही महत्त्वाचे पद न मिळाल्याने ते नाराज होते.
मूळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असलेले किशोर तिवारी यांनी शेतकर्यांच्या आत्महत्येचा मुद्या लावून धरल्याने प्रसिद्धीच्या झोतात आले होते. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकर्यांच्या आत्महत्येचा प्रश्नाला वाचा फोडण्यात किशोर तिवारी यांचा मोठा वाटा आहे.
विनायक राऊत Vinayak Raut, अरविंद सावंत Arvind Sawant, संजय राऊत Sanjay Raut, मिलिंद नार्वेकरसारख्या Milind Narwekar नेत्यांनी मातोश्री व सेना भवनावर ताबा केला आहे. विधानसभा निवडणुकीमधील पराभवाची जबाबदारी निश्चित करण्यात आली नाही. त्यामुळे जनाधार असलेल्या नेत्यांना पक्ष सोडण्यास लावणाऱ्या पोटभरु कावेबाज नेत्यांची हकालपट्टी करा, अशी मागणी शिवसेना प्रवक्ते किशोर तिवारी यांनी केली होती.
Congress leader on Sahasram Korote : काँग्रेसशी गद्दारी करणारे भटकतच राहणार
सत्य बोलण्याचं धाडस केलं
त्यांच्या मुलाखतीनंतर तडका फडकी किशोर तिवारी यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. जो माणूस सत्य बोलण्याचे धाडस करतो, उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी मागील पाच वर्षांपासून उभा राहतो. एवढेच नव्हे भाजपाच्या नेत्यांना त्यांची जागा दाखवितो. अशा एका चळवळीच्या कार्यकर्त्याला साधी सूचना न देता त्याची थेट हकालपट्टी किती योग्य आहे? असा सवाल तिवारी यांनी प्रसिद्धी पत्रकातून केला आहे.