Kite Flying Nylon Manja : पतंग उडवताना तोल गेला, छतावरून खाली पडून मृत्यू

Man loses balance, falls from roof to death : पतंगांमुळे नागपुरात दुसरा बळी

Nagpur दरवर्षी पतंग महोत्सवात कुणाचा जीव जाऊ नये म्हणून प्रशासनाने उपाययोजना करतं. नायलॉन मांजावर बंदी आणली. धाड टाकून मांज्यावर रोलर फिरवला. शहरातील उड्डाणपूल बंद ठेवले. त्यामुळे दुर्दैवी घटनांची संख्या कमी झाली. पण घरी पतंग उडवताना एकाचा छतावरून खाली पडून मृत्यू झाला. आणि जनजागृतीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. नागपुरातील हा पतंगाचा दुसरा बळी ठरला आहे.

छतावर पतंग उडवताना तोल जाऊन थेट खाली पडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. खाली पडल्यावर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण गंभीर जखमी असल्यामुळे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना अजनी पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. कृष्णा जगतनिल बयरीकर (३६) रा. जोशीवाडी, रामेश्वरी रोड असे मृताचे नाव आहे.

CM Devendra Fadnavis, Nagpur Police : लहान भावापुढेच मोठ्या भावाचा निर्घृण खून!

मंगळवारी संपूर्ण शहरात मकरसंक्रांतीचा उत्साह साजरा झाला. तरुणांनी आकाशात पतंग उडवून हा उत्साह साजरा केला. मात्र, पतंगबाजीसाठी नॉयलान मांजाचा वापर केल्याने अनेकजण जखमी झाल्याच्याही घटना घडल्या. पतंगबाजीचा हा छंद दोघांचा जीवही घेऊन गेला. छतावर पतंग उडवताना तोल जाऊन पडल्याने गिट्टीखदान ठाण्यांतर्गत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पुढे आली होती. तशीच एक घटना अजनी पोलीस ठाण्यांतर्गतही पुढे आली आहे.

Dharmapal Meshram : सत्तेविना शरद पवार वैफल्यग्रस्त

मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास कृष्णा बयरीकर घराच्या छतावर पतंग उडवित होते. पतंग उडविण्यात ते इतके मग्न झाले की, छताच्या काठावर पोहोचल्याचेही त्यांना भान राहिले नाही. या दरम्यान तोल गेल्याने ते थेट छतावरून खाली पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. कुटुंबीयांनी तत्काळ त्यांना मेडिकल रुग्णालयात दाखल केले. त्यांचा बुधवारी पहाटेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी मिळालेल्या सूचनेवरून अजनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.